• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?

July 23, 2026 by admin Leave a Comment


काही दिवसांपूर्वी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात राडा झाला होता. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी विविध घटनांच्या आधारे आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल केले आहेत. यात बेकायदेशीर जमाव, सरकारी कामात अडथळा, पोलिसांवर हल्ला, दंगल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. मात्र, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कोणत्याही एफआयआरमध्ये एकाही आरोपीचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता हे आरोपी कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. आंदोलकांवरील आरोप किती गंभीर आहेत याबाबत माहिती जाणून घेऊयात.

कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान विविध ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाला. त्यामुळे संसद मार्ग, कनॉट प्लेस, बाराखंबा रोड, मंदिर मार्ग आणि कर्तव्य पथ या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहिता, शस्त्रास्त्र कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा अंतर्गत विविध कलमे लावण्यात आली आहेत.

कोणत्या पोलीस ठाण्यात किती एफआयआर?

संसद मार्ग पोलीस ठाण्यात सर्वाधिक 4 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात 3 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. मंदिर मार्ग, बाराखंबा रोड आणि कर्तव्य पथ येथे प्रत्येकी 1 एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्व प्रकरणांचा तपास सुरू असून पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

संसद मार्ग पोलीस ठाण्यात सर्वात गंभीर गुन्हा

संसद मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेली एफआयआर सर्वाधिक गंभीर आहे. आंदोलनकर्त्यांनी सरकारी आदेशांचे उल्लंघन केले, पोलिसांवर हल्ला केला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आणि संपूर्ण घटना पूर्वनियोजित कटाचा भाग होती असा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातही अद्याप कोणत्याही व्यक्तीचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढली आहे.

संसद मार्ग एफआयआरमधील आरोप

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनादरम्यान परवानगीशिवाय मोठा जमाव जमविण्यात आला, सरकारी आदेशांचे उल्लंघन करण्यात आले, पोलिसांना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यात आले आणि त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तसेच सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आणि हिंसाचार घडवून आणल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.

कोणती कलमे लावली?

संसद मार्ग एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेतील अनेक गंभीर कलमांसह Arms Act आणि PDPP Act मधील कलमे लावण्यात आली आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर जमाव, दंगल, समान हेतूने गुन्हा करणे, सरकारी कामात अडथळा, पोलिसांवर हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या कलमांचा समावेश आहे. या सर्व बाबींचा तपास सुरू असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. बाराखंबा रोड पोलिसांकडूनही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

आरोपींची नावे नाहीत, मग पुढे काय?

या सर्व एफआयआरचे वैशिष्ट्य म्हणजे एकाही व्यक्तीचे नाव अद्याप नमूद केलेले नाही. कायदेशीर प्रक्रियेनुसार, पोलिसांकडे घटनेची माहिती असते; मात्र आरोपींची ओळख किंवा त्यांची भूमिका अद्याप निश्चित झालेली नसते, अशा वेळी नाव नोंदविल्याशिवाय एफआयआर दाखल केली जाते. यानंतर पोलिस सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ रेकॉर्डिंग, मोबाईल फुटेज, छायाचित्रे, डिजिटल पुरावे यांच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटवू शकतात. सध्या वरील सर्व फुटेजचा तपास सुरू आहे. एकदा आरोपींची नावे निश्चित झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in