• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आरसीबीच्या खेळाडूवर बंदी, महाअंतिम सामन्यातील विजयानंतर बीसीसीआयची मोठी कारवाई, कारण…

June 1, 2026 by admin Leave a Comment

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2026 ट्रॉफी जिंकली. आरसीबीच्या या विजयाचा जल्लोष सुरु आहे. आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आरसीबीला पहिल्या ट्रॉफीसाठी 18 व्या हंगामांची वाट पाहावी लागली. मात्र त्यानंतर आरसीबीने सलग 2 ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने 31 मे रोजी गुजरात टायटन्सला पराभूत करुन आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आरसीबी यासह सलग 2 ट्रॉफी जिंकणारी तिसरी टीम ठरली. तसेच रजत पाटीदार सलग 2 ट्रॉफी जिंकून देणारा एकूण तिसरा कर्णधार ठरला. एकूणच आरसीबीच्या या विजयाचा जल्लोष सुरु असताना दुसऱ्या बाजूला चॅम्पियन टीमच्या एका खेळाडूला बीसीसीआयने तगडा झटका दिला आहे.

टीम डेव्हीडवर मोठी कारवाई

बीसीसीआयने आरसीबीचा ऑलराउंडर टीम डेव्हीड याच्यावर कारवाईचा चाबूक फिरवला आहे. टीमला अंतिम सामन्यादरम्यान नियमांचं उल्लंघन करणं चांगलंच महागात पडलं आहे. त्यामुळे बीसीसीआयने टीमवर एका सामन्यासाठी बंदी घातली आहे. तसेच बीसीसीआयने टीमला दंड ठोठावण्यासह डेमेरीट पॉइंट्सही दिले आहेत. आयपीएलने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

अंपायरला आईस बॅग फेकून मारली

टीमने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यनादरम्यान फिल्डिंग करताना नियमांचं उल्लंघन केलं. आरसीबीने गुजरातला डावातील 10 व्या ओव्हरदरम्यान झटका दिला. टीमने या दरम्यान अंपायर नितीन मेनन यांच्या दिशेने आईस बॅग फेकली. टीमकडून अशाप्रकारे आयपीएल 2.9 कलमाचं उल्लंघन झालं. 2.9 कलमाअंतर्गत बॉल किंवा इतर कोणतीही वस्तू फेकल्यास कारवाई करण्याची तरतूद आहे. डेव्हिड लेव्हल 1 अंतर्गत दोषी आढळला. त्यामुळे टीमला त्याच्या एका सामन्याच्या एकूण मानधनापैकी 50 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागली आहे. तसेच टीमच्या खात्यात 2 डेमेरीट पॉइंट्स जोडण्यात आले आहेत. टीमने सामनाधिकाऱ्यांसह झालेली चूक मान्य केली.

चुकीला माफी नाही!

🚨 News 🚨

Tim David of @RCBTweets has been fined 50% of his match fee for breaching Level 1 of the IPL’s Code of Conduct for Players and Team Officials during the #TATAIPL 2026 Final against #GT at the Narendra Modi Stadium, Ahmedabad.

Details 🔽 https://t.co/FN8adJQ36s

— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2026

टीमवर एका सामन्याची बंदी

दरम्यान टीमवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची सांगता झाली आहे. त्यामुळे आगामी हंगामातील पहिल्या सामन्यात टीमला खेळता येणार नाही. टीम यासह एका सामन्याच्या बंदीची कारवाई होणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी हार्दिक पंड्या याला स्पर्धेच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) पहिल्या सामन्यात बंदीमुळे खेळता आलं नव्हतं. मुंबईचं नेतृत्व करताना हार्दिक मोहिमेतील शेवटच्या सामन्यात (IPL2025) ओव्हर रेट कायम राखण्यात अपयशी ठरला होता. हार्दिकची तिच चूक करण्याची तिसरी वेळ ठरली होती. त्यामुळे हार्दिकवर एका सामन्यासाठी बंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे हार्दिकला 18 व्या मोसमातील मुंबईच्या पहिल्या सामन्यात सहभागी होता आलं नव्हतं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बाळासाहेब ठाकरेंची किरण पावसकरांकडून खिल्ली, आता एकनाथ शिंदे कारवाई करणार?
  • ‘महाभारत’मधील कुंतीने दीड वर्षे सर्वांपासून गुप्त ठेवलं लग्न, आता थेट शेअर केले नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो
  • त्यांना ताकदवान लोक नको, गुलाम लोकं पाहिजेत, बंडखोर संजय दिना पाटील यांचा पलटवार
  • आता राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष, जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती खासदार?
  • Bigg Boss : बिग बॉसमध्ये सिगरेट, दारू, बाथरुममध्ये सेक्स अन्…, पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीकडून शोची पोलखोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in