• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयपीएलमध्ये स्मार्ट सनग्लासेस वापरावर बंदी, बीसीसीआयने असं पाऊल उचलण्याचं कारण की…

May 30, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत यंदा काही कठोर नियम लादले गेले. काही घडामोडी घडल्याच्या चर्चेनंतर नियम कठोर केल्याचं बोललं जात आहे. आता स्पर्धा संपण्यासाठी फक्त दोन सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. असं असताना बीसीसीआयने आणखी एक नियम जाहीर केला आहे. या नियमानुसार, आयपीएलमधील खेळाडूंना आणि मॅच अधिकाऱ्यांना स्मार्ट सनग्लासेस वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बीसीसीआयच्या अँटी करप्शन स्पष्ट केलं की, पीएमओए म्हणजे प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स भागात स्मार्ट सनग्लासेस वापरण्यावर पूर्णपणे बंदी असेल. इतकंच नाही तर बोर्डाच्या या नियमाचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. बीसीसीआयने या सनग्लासेस वापरासंदर्भात फ्रेंचायझींना एक सूचना दिली आहे. स्मार्ट सनग्लासेसमुळे सामन्याच्या सुरक्षेला आणि निष्पक्षतेला ठेच लागू शकते. कारण गॉगल्स लाईव्ह स्ट्रीमिंग, व्हिडीओ कॉलिंग, मोबाईल डेटा किंवा वायफायद्वारे संदेश पाठवू किंवा मिळवू शकतात.

मोबाईल आणि स्मार्ट सनग्लासेसही जमा करावे लागणार

बीसीसीआयने स्पष्ट केलं की, स्मार्ट सनग्लासेस ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग उपकरणे आणि संवाद साधने या दोन्ही प्रकारात मोडतात. त्यामुळे स्मार्ट सनग्लासेसच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. आयपीएलची सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने उचललेले आणखी एक ठोस पाऊल मानले जात आहे. आता आयपीएल संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला खेळाच्या मैदानात प्रवेश करताना त्यांचे मोबाईल फोन, स्मार्टवॉच आणि स्मार्ट सनग्लासेस सुरक्षा संपर्क अधिकाऱ्याकडे जमा करावे लागतील. तसे आदेश सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला दिले आहेत.

नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई

प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स भागात स्मार्ट सनग्लासेस वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी या निर्देशाचे उल्लंघन केले आणि आपले सनग्लासेस जमा केले नाहीत, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आयपीएल आचारसंहितेनुसार शिक्षा केली जाईल, असा इशारा बीसीआयने दिला आहे. आयपीएल स्पर्धेच्या सुरूवातील राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांनी सामन्यादरम्यान डगआऊटमध्ये फोन वापरल्याने वाद निर्माण झाला होता. तेव्हा भिंदर यांना ताकीद देण्यात आली होती. इतकंच काय तर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Farmer Loan Waiver: शेतकर्‍यांसाठी गुडन्यूज! खात्यात खटाखट पैसा, दुसरा हप्ता वितरीत, यादीत नाव कसं चेक करणार?
  • एकेकाळी हॉटेलमध्ये काम करायची ही अभिनेत्री, हृतिक, रणबीर, रणवीरसह केलं काम; ओळखलं का ?
  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in