• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी नव्या संघासोबत खेळणार? सीएसकेसोबत काय घडलं?

May 20, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात महेंद्रसिंह धोनीचा दबदबा पाहायला मिळाला आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने पाचवेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि महेंद्रसिंह धोनी एक नातं तयार झाला आहे. या शिवाय ही फ्रेंचायझी पूर्णच होऊ शकत नाही. पण असं असताना यंदाच्या पर्वात महेंद्रसिंह धोनी एकही सामना खेळला नाही. या पर्वात महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या होमग्राउंड उतरला पण फक्त चाहत्यांचं अभिवादन करण्यासाठी… आता महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्सपासून फारकत घेण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेलं नातं तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सबाबत एक आश्चर्यकारक दावा केला आहे.

महेंद्रसिंह धोनी आता नव्या संघासाठी खेळणार

क्रिकब्लॉगरच्या रिपोर्टनुसार, महेंद्रसिंह धोनी येणाऱ्या पर्वात चेन्नई सुपर किंग्ससोबत नसेल, असं बोललं जात आहे. यंदाच्या पर्वातही त्याच्या निवृत्तीच्या बातम्यांचं पेव फुटलं पण त्याबाबत अधिकृत असं काहीच समोर आलं नाही. त्यामुळे पुढच्या पर्वातही खेळेल असं बोललं जात आहे. पण दुसऱ्या फ्रेंचायझीकडून मैदानात उतरू शकतो. आयपीएल 2026 मध्ये फिटनेसच्या कारणामुळे धोनी मैदानापासून लांब होता असं नाही. त्याला काही कारणंही असल्याचा दावा केला जात आहे. आयपीएल 2026 पूर्वी त्याच्या पोटरीला दुखापत झाली होती. पण नंतर संघातील खेळाडूंची रचना आणि भविष्यातील रणनिती प्रमुख कारण ठरेल.

रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्सला आता तरूण खेळाडूंसह एक नवा संघ बांधायचा आहे. गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघ व्यवस्थापन आणि धोनी यांच्यात वाद झाले आहेत. खेळाडूंची देवाणघेवाण आणि काही निर्णयावरून धोनी नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्याच्याशी कोणतीही चर्चा न करता निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे धोनी आणि संघ व्यवस्थापनातील दुरावा वाढला आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनी 2008 पासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. दरम्यान फ्रेंचायझीलवर बंदी घातल्याने धोनी दोन पर्वात दुसऱ्या संघाकडून खेळला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kangana Ranaut: समन्स आलं अन् होणारे सासू-सासरेच पळाले..; लग्नाबाबत कंगनाने सांगितला धक्कादायक किस्सा
  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in