• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयपीएलमध्ये नव्या फ्रेंचायझीचे वेध! वैभव सूर्यवंशी आणि इशानचा खेळ पाहून अब्जाधीश उद्योगपतीची इच्छा

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत बिहारच्या क्रिकेटपटूंनी आपल्या खेळीने छाप सोडली आहे. या स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि सनरायझर्स हैदराबादचा विकेटकीपर फलंदाज असलेल्या इशान किशनने आपल्या खेळीने प्रभावित केलं आहे. या दोघांनी फलंदाजीत आक्रमक बाणा दाखवत चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला आहे. या दोघांचा खेळ पाहून भारताचे अब्जाधीश उद्योगपती असलेल्या वेदांता समुहाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांनी बिहार संघ उतरवण्याची मागणी केली आहे. बिहारचा संघ आयपीएल स्पर्धेत असावा अशी त्यांची मागणी आहे. बिहार देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्याचा हक्क असल्याचं त्यांनी सांगितलं.

आयपीएल स्पर्धेत बिहारला संधी मिळणार?

अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित इशान किशन, वैभव सूर्यवंशी आणि साकिब हुसैनच्या खेळाची स्तुती केली. त्याने लिहिलं की, ‘चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यासारखा एक महान संघ बिहारला मिळायला हवा, असे तुम्हाला वाटत नाही का? बिहारने देशाला अनेक असाधारण क्रिकेटपटू दिले आहेत. पाटणा येथे जन्मलेल्या ईशान किशनने सर्वात कमी चेंडूंचा सामना करत सर्वात जलद एकदिवसीय द्विशतक झळकावले. समस्तीपूरचा वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. गोपालगंजमधील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शकिब हुसेनच्या उत्कृष्ट गोलंदाजीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘

क्या आपको नहीं लगता Chennai Super Kings, Mumbai Indians और Kolkata Knight Riders की तरह बेमिसाल बिहार की भी एक टीम होनी चाहिए?

बिहार की मिट्टी ने देश को बहुत से बेहतरीन क्रिकेट खिलाड़ी दिए हैं।

पटना में जन्मे ईशान किशन ने सबसे कम गेंदों में ODI double century लगाई। समस्तीपुर… pic.twitter.com/bgScCh40Zd

— Anil Agarwal (@AnilAgarwal_Ved) May 22, 2026

अनिल अग्रवाल यांनी पुढे लिहिलं की, ‘एक गोष्ट मला नेहमी खटकते. क्रिकेटमध्ये आपल्या बिहारला जी ओळख आणि मान्यता मिळायला हवी, ती का मिळाली नाही? बिहारच्या तरुणांना प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची पूर्ण संधी मिळावी आणि आपल्या खेळाडूंना इथेच बिहारमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, हे सुनिश्चित करणे हे माझे नेहमीच स्वप्न आणि प्रयत्न राहिले आहेत.’

अनिल अग्रवाल यांनी बिहार राज्याचा अभिमान बाळगत पुढे लिहिलं की, ‘मला पूर्ण विश्वास आहे की, जर आपल्या मुलांना योग्य प्रेरणा आणि सुविधा मिळाल्या, तर आपल्या बिहारमधून उदयास येणारा संघ जगातील सर्वोत्तम संघ बनेल. आणि या प्रयत्नात मी बिहारच्या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. बिहारच्या क्रिकेट संघाला आणि येथील खेळाडूंना पुढे नेण्यासाठी मी माझ्या बाजूने बिनशर्त पाठिंबा देईन. माझ्यासाठी बिहार हे केवळ एक राज्य नाही, तर ती एक भावना आहे. आता आपल्या मातीतील प्रतिभेला मैदानावर चमकण्याची वेळ आली आहे.’

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकेकाळी दीपिका पादुकोणसाठी दरवाजा खोलायची माजी मुख्यमंत्र्यांची नात, आज आलिया भट्टला देतेय टक्कर
  • ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाचा मोठा निर्णय, थेट..
  • मुलगा अन् सुनेशी वाजलं, वडिलांनी अंगावरच चढवली कार.. अख्खं शहर हादरलं
  • Maharashtra News LIVE : भोंदू अशोक खरातविरोधातील खटल्याची आजपासून सुनावणी
  • मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांना फोन करत एकनाथ शिंदे यांनी दिला मोठा शब्द, थेट खुलासा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in