• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आम्ही 1500 दिले की महिला.., आदिती तटकरेंनी उडवली लाडक्या बहिणींची खिल्ली, वातावरण तापण्याची शक्यता

July 26, 2026 by admin Leave a Comment


ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने या योजनेसाठी केवायसी सक्तीची केली, केवायसीनंतर लाखो महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवत त्यांची नावं या योजनेतून वगळ्यात आली, त्यामुळे विरोधकांकडून या मुद्द्यावरून आता सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीसाठीच ही योजना सुरू केली होती का? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान या योजनेवर बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी आता महिलांची खिल्ली उडवली आहे. त्या वाशिममध्ये बोतल होत्या, आदिती तटकरे यांच्या या वक्त्यावरून आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यात आहे. आम्ही दिल्लेले 1500 रुपये महिला या शॉपिंगवर खर्च करतता, पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर मार्केटमध्ये गर्दी वाढते, असं विधान त्यांनी केलं आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे? 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लडकी बहीण योजनेच्या पैशांवरून महिलांची खिल्ली उडवली असून, आम्ही पैसे दिले की महिला शॉपिंगसाठी मार्केटमध्ये गर्दी करतात, महिलांपेक्षा व्यापारीच आम्हाला विचारतात पैसे कधी जमा करणार आहात, असं विधान आदिती टकरे यांनी केलं आहे. त्या वाशिम येथील अहिल्या भवनच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त  आयोजित संवाद कार्यक्रमात बोलत होत्या.आदिती तटकरे यांच्या या वक्ताव्यानंतर आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

ईकेवायसी पुन्हा सुरू 

दरम्यान या योजनेसाठी सरकारने ईकेवायसीसाठी दिलेली मुदत संपली होती, अनेक महिलांना ईकेवायसी करता आली नव्हती, अशा महिलांसाठी आता दिलासा देणारी बातमी आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा ईकेवायसीला सुरुवात झाली आहे, पुढील सहा महिने ईकेवायसी करता येणार आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • आदित्य ठाकरेंचा सवाल: “पालकमंत्र्यांचे बॅनर ए-वन, पण रस्त्यांचं काय?”
  • कीबोर्डवर फक्त टायपिंग करता? ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे तुमचे काम होईल झटपट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in