• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आमिर खानचा 38 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, बजेट 85 कोटी अन् कमाई 792 कोटी रुपये

June 29, 2026 by admin Leave a Comment


Aamir Khan : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानने आपल्या 38 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या नावावर बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम आहेत. त्यापैकी 2014 मध्ये प्रदर्शित झालेला ‘पीके’ हा चित्रपट प्रचंड गाजला. केवळ भारतातच नाही तर जगभरात या चित्रपटाने विक्रमी कमाई करत तब्बल 831 टक्के नफा मिळवला होता. विशेष म्हणजे, हा चित्रपट 2014 मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला होता.

19 डिसेंबर 2014 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ या कॉमेडी आणि सायन्स-फिक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी केले होते. चित्रपटात आमिर खानने पृथ्वीबाहेरील एका परग्रहवासीयाची भूमिका साकारली होती. पृथ्वीवर आलेल्या या व्यक्तीचा उद्देश देवाचा शोध घेणे हा असतो. या प्रवासात त्याला पत्रकार जगत जननी (अनुष्का शर्मा) हिची साथ मिळते.

85 कोटींच्या बजेटमध्ये 792 कोटींची कमाई

‘पीके’ची कथा राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा यांनी लिहिली होती. या दोघांनीच चित्रपटाची निर्मितीही केली होती. उपलब्ध माहितीनुसार, सुमारे 85 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात 792 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यापैकी भारतीय बॉक्स ऑफिसवर 340 कोटी रुपयांची कमाई झाली. त्यामुळे चित्रपटाला तब्बल 831 टक्के नफा मिळाला आणि तो त्या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला.

2014 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत ‘पीके’ अव्वल स्थानी होता तर दुसऱ्या क्रमांकावर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘हॅपी न्यू इयर’ हा चित्रपट होता.

ओटीटीवरही उपलब्ध

ज्यांनी अद्याप ‘पीके’ पाहिलेला नाही, त्यांच्यासाठी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. सामाजिक संदेश, विनोद आणि वेगळ्या कथानकामुळे आजही हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. सध्या आमिर खान ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. सनी देओल मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in