
‘भारत सहिष्णु आहे, मात्र कमजोर नाही, आम्ही जोखीम देखील घेऊ शकतो आणि घरात घुसून जोरदार प्रहार देकील करु शकतो. आमच्या सहनशीलतेला कमजोरी समजण्याची चूक करु नका असा सज्जड दम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी डिस्कव्हरीच्या आगामी डॉक्युमेंट्री सिरीजमध्ये म्हटले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’वर डोभाल यांची ही पहिली मुलाखत म्हटली जात आहे. यात त्यांनी ८८ तास चाललेल्या सैन्य मोहिमेमागची रणनिती आणि निर्णय प्रक्रीये संदर्भात विस्ताराने चर्चा केली आहे. डोभाल यांनी म्हटले आहे की या ऑपरेशनचा हेतू शत्रूच्या त्या तळांना उद्धवस्त करणे होते, जे विशेष रुपाने पहलगाम अतिरेकी हल्ल्याला जबाबदार होते.
‘Declassified: Operation Sindoor’ ही दोन भागांची डॉक्यूमेंट्री सीरीज आहे. हीचे प्रसारण शनिवारी रात्री ९ वाजता डिस्कव्हरी प्लस वर केले जाणार आहे.यात ऑपरेशन सिंदूरशी संबंधित घटनाक्रम आणि भारताच्या शीर्ष सैन्य तसेच सुरक्षा नेतृत्वाचे निर्णयांना प्रत्यक्ष विवरणांसह सादर केले जाणार आहे.
डोभाल यांनी भारताची निती आणि सैन्य क्षमते संदर्भात स्पष्ट संदेश दिला आहे. ते म्हणाले की, ‘जगासाठी हा संदेश खूपच स्पष्ट आहे की भारताच्या उदारता वा भारताच्या सहनशील होण्याला त्याची कमजोरी समजू नये. भारत जोखीम घेऊ शकतो आणि जोरदार प्रहार करु शकतो, मग परिणाम भले काही होवो.’
डिस्कव्हरीने जारी केलेल्या निवदेनानुसार ही दोन भागाची डॉक्युमेंटरी सिरीजमध्ये भारताचे सैन्य आणि राष्ट्रीय सुरक्षा नेतृत्वाला सामील केले आहे. यात ऑपरेशन सिंदुर दरम्यान घेतलेले महत्वाचे निर्णय आणि घटनाक्रमांना त्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाद्वारे समोर ठेवण्यात आले आहे, ज्यानी भारताच्या प्रत्युत्तराखालील कारवाईची निगरानी केली होती. डोभाल यांनी यात सैन्य कारवाई मागची निर्णय प्रक्रिया, रणनिती आणि दृढ संकल्पावर आपला बाजू मांडताना दिसणार आहेत.
88 तास चालली मोहिम
ऑपरेशन सिंदूरची सुरुवात ७ मेच्या सकाळी झाली होती. या कारवाईत २२ एप्रिल रोजी पहलगामवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या बदला घेण्यात आला होता. भारतीय सशस्र बलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेकी तळांवर अचूक हल्ले केले होते.
या नंतर भारतावरही पाकिस्तानने सैन्य कारवाई सुरु केली होती. भारताने याचे उत्तर देताना ऑपरेशन सिंदूर राबवले. दोन्ही अण्वस्र संपन्न देशातील ही सैन्य चकमक सुमारे ८८ तास चालली. १० मे रोजी सायंकाळी भारत आणि पाकिस्तानात दरम्यान सहमती झाल्यानंतर सैनिक कारवाई थांबली.
Leave a Reply