• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता आईच्या हातचं जेवण अन् शांत झोप हवी… घरी पोहोचताच अभिजीत दिपकेंचे विधान

July 29, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके 40 दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगर येथील घरी परतले. संभाजीनगरमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिपके यांनी केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. घरी आल्यावर आता काय करणार यावर बोलताना दिपके यांनी आता सर्वप्रथम शांत झोप घेणार आणि आईच्या हातचे जेवण आवडीने खाणार असं विधान केले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची

छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, सरकार कितीही नवे कायदे बनवले तरी ते प्रामाणिकपणे राबवणारे अधिकारी नसतील तर त्या कायद्यांचा कोणताही परिणाम होणार नाही. केवळ कायदा करणे हा उपाय नसून त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. पेपर लीक प्रकरणांच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, पहिल्याच सुनावणीला केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चे अधिकारी न्यायालयात उपस्थित नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागली. यावरून केवळ कायदे बनवून व्यवस्था बदलत नाही, तर त्यांची अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्तीही आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिपके म्हणाले की, ‘मोदींनी पंतप्रधानपद सोडून एक चांगले इन्फ्लुएन्सर म्हणून काम करावे आणि दुसऱ्या व्यक्तीला देशाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी. देशाला अशा व्यवस्थेची गरज आहे जिथे निर्णयांचा परिणाम प्रत्यक्ष जमिनीवर दिसून येईल.’

युवकांना त्रास दिल्यास पुन्हा मोठे आंदोलन

अभिजीत दिपके यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि युवकांना पोलिसांकडून त्रास दिला गेला, तर पुन्हा मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही दिला. युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला लोकशाही मार्गाने उत्तर दिले जाईल. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही सरकारविरोधातील युवकांचा संताप कमी झालेला नाही. येत्या काळात याहून मोठे आंदोलन उभे राहू शकते, कारण विद्यार्थी आणि युवक सातत्याने आपल्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत असं दिपके म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in