• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आठवड्याचा एक दिवस स्वतःसाठी राखून ठेवाच, ‘त्या’ दिवशी करा असं काम, फायदे जाणून व्हाल अवाक्

June 10, 2026 by admin Leave a Comment


आपण शरीर हे कोणतं यंत्र नाही… यंत्राला देखील अधिक काम केल्यानंतर बंद करण्याचा किंवा रिस्टार्ट करण्याचा सल्ला दिला जातो. त्याच प्रमाणे शरीराला देखील कुठेतरी रिस्टार्टची गरज असते. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस तरी स्वतःसाठी काढता आला पाहिजे, ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात आणि पुढचा दिवस नव्याने सुरु करण्यासाठी वेगळी ऊर्जा मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट तर, कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि भविष्यासाठीची शर्यत यामध्ये अनेक जण स्वतःच्या आरोग्याकडे आणि मानसिक सुखाकडे दुर्लक्ष करतात. सतत विचार, ताण, अविरत धावपळ यामुळे अनेक आजार डोकं वर काढतात आणि काही आजार तर मनाचेच असातत. यासाठी ‘सेल्फ-केअर डे असलाच पाहिजे. म्हणजे स्वतःच्या काळजीचा दिवस.

हा असा दिवस आहे जेव्हा आपण आपले शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य पुनर्संचयित करण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ काढतो. हा दिवस यंत्राप्रमाणे सतत काम करणाऱ्या शरीराला विश्रांती देण्यास आणि मनाला दैनंदिन तणावातून मुक्त करण्यास मदत करतो. हा वेळेचा अपव्यय नसून, येणाऱ्या दिवसांमध्ये अधिक ऊर्जेने परतण्यासाठी स्वतःला चार्ज करण्याचा काळ आहे.

या दिवशी आवडते पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे किंवा निसर्गरम्य ठिकाणी थोडा वेळ फिरणे यामुळे मन शांत होण्यास मदत होते. योग, ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम केल्याने चिंता आणि नैराश्य दूर ठेवण्यास मदत होते. पुरेशी विश्रांती घेतल्यानंतर, जेव्हा तुम्ही कामावर किंवा अभ्यासाला परत जाल, तेव्हा तुमची एकाग्रता आणि कार्यक्षमता दुप्पट होईल. स्वतःच्या गरजांना प्राधान्य दिल्याने आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढेल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्वतःची काळजी घेण्याच्या दिवशी तुम्हाला काही मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. काही सोप्या गोष्टी करून तुम्ही हा दिवस सुंदर बनवू शकता. काही काळासाठी मोबाईल फोन आणि सोशल मीडिया पूर्णपणे टाळा. एवढंच नाही तर, पौष्टिक अन्न खाण्याची आणि पुरेशी झोप घेण्याची खात्री करा. स्वतः स्वतःची काळजी घ्या. आजच्या या धकाधकाच्या जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि ती म्हणजे, तुमचे आरोग्य आणि आनंद इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in