• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हा स्टार खेळाडू घेणार निवृत्ती? बोर्डाकडून मिळाली खास ऑफर

July 4, 2026 by admin Leave a Comment

बांग्लादेश क्रिकेट संघाने मागच्या काही वर्षात चांगली प्रगती केली आहे. दिग्गज संघांना पराभवाची धूळ चारत मोठे उलटफेर केले आहेत. त्यामुळे भविष्यात बांग्लादेश क्रिकेट संघाने मोठी कामगिरी केली तर आश्चर्य वाटायला नको.. यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आतापासूनच पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. बोर्ड अनुभवी खेळाडून निवृत्तिनंतरही संघासोबत कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. महमूदुल्लाह रियादला नुकतीच प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. आता बोर्ड आणखी एक पाऊल उचलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने विकेटकीपर फलंदाज मुश्फिकुर रहीम याला निवृत्तीनंतर कोचिंग स्टाफचा भाग होण्यासाठी ऑफर दिली आहे. सध्या मुश्फिकुर रहीम कसोटी आणि देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. पण त्याच्या निवृत्तीआधीच बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने हा प्लान आखला आहे.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं की, जेव्हा मुश्फिकुर रहीम क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल तेव्हा त्याला कोचिंगच्या भूमिकेत पाहू इच्छित आहोत. मुश्फिकुरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट अनुभव युवा खेळाडूंच्या भविष्यात मार्गदर्शक ठरू शकतो. बीसीबी गेम डेव्हलपमेंटचे अध्यक्ष फईम सिन्हा म्हणाले की, मुश्फिकुर रहीमसारख्या खेळाडूचा अनुभव हा बांग्लादेश क्रिकेटसाठी एक अमूल्य संपत्ती आहे आणि बोर्डाला कोणत्याही परिस्थितीत त्याचा फायदा घ्यायचा आहे. मुश्फिकुर रहीम हा बांगलादेशच्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याने जवळपास दोन दशके देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

बीसीबी गेम डेव्हलपमेंटचे अध्यक्ष फईम सिन्हा यांनी सांगितलं की, “महमुदुल्ला आणि मुश्फिकुर यांच्यासारखे खेळाडू अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. त्यांनी जागतिक क्रिकेटमधील बदल जवळून पाहिले आहेत. त्यांचा अनुभव आपल्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. जर मुशफिकुरला प्रशिक्षणात रस असेल किंवा कोणत्याही प्रकारे क्रिकेटशी जोडलेले राहायचे असेल, तर आम्ही त्याला आमच्या संघात नक्कीच सामील करून घेऊ इच्छितो. जर आपण अशा अनुभवी खेळाडूला टिकवून ठेवू शकलो नाही, तर ते आपले सर्वात मोठे अपयश ठरेल.”

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन
  • IND vs ENG, 2nd T20: इंग्लंडने भारताला 4 गडी राखून नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडी
  • Shraddha Kapoor : टायटलचा वाद मिटला, आता ‘ईठा’ चित्रपट रिलीज होण्याआधी श्रद्धा कपूर एक महत्वाचं काम करणार
  • मोठी बातमी! पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खळबळ
  • जेवणानंतर लिंबू-आल्याचे पेय पिणे ठरू शकते फायदेशीर? जाणून घ्या पचन सुधारण्याचे नैसर्गिक रहस्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in