• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अश्लील डान्स..; संस्कृतीचे धडे देणाऱ्या कंगना यांचा पार्टीतील व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी साधला निशाणा

July 31, 2026 by admin Leave a Comment


कॉर्कोच जनता पार्टीनी पुकारलेल्या आंदोलनात जेन झींना यश मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आजच्या पिढीचा विरोध केली. ‘आजच्या पिढीच्या महिलांना गटर छाप, भ्रष्ट आणि अनेक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या…’, असं म्हणत कंगना यांनी महिलांच्या चारित्र्यावर बोट ठेवला. आता जेन झी महिलांवर निशाणा साधणाऱ्या कंगना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कंगना बेधडकपणे नाचताना दिसत आहेत. ज्यामुळे अनेकांना त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

जेन झींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कंगना यांचा 2018 मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, व्हिडीओ कान्स फिल्म फेस्टिव्हल मधील आहे… सध्या सोशल मीडियावर कंगना यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटकऱ्यांना अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by national film awards (@nfilmawards)

 

व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि कंगना राणौत यांच्यावर निशाणा साधला आहे. व्हिडीओतील कंगना यांच्या डान्सला अनेकांनी ‘अश्लील डान्स म्हटलं आहे…’, तर अनेकांनी ‘सर्वांनी संस्कृतीचे धडे देणाऱ्या कंगना स्वतः पाश्चात्य संस्कृतीत रमल्या आहेत…’, अनेकांनी कमेंट करत कंगना यांच्यावर निशाणा साधला, अनेकांनी त्यांच्या डान्सचं समर्थन केलं आहे. ‘प्रत्येकाला आपल्या खासगी आयुष्यात पार्टी करण्याचा अधिकार आहे…’, अशी भूमिका देखील अनेकांनी घेतली आहे. सध्या सर्वत्र कंगना यांच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

जेन झींबद्दल कंगाना यांचं वादग्रस्त वक्तव्य…

कंगना म्हणल्या, ‘आजच्या पिढीच्या स्त्रीयांनी वेस्टर्न कल्चर स्वीकारलं आहे. यांचा कोणत्याच विषयावर अभ्यास नाही आणि त्या दिसायला देखील सुंदर नाहीत, त्यांची मानसिकता देखील चांगली नाही… त्यांचे विचार इतके भ्रष्ट आहेत की, त्या उत्तम गृहिणी देखील होऊ शकत नाहीत. या महिलांकडे समाजाला देण्यासाठी काहीही नाही. असं असताना ड्रग्ज घेणं, दारु पिणं आणि अनेकांशी शारीरिक संबंध ठेवत, त्या आपल्या स्वातंत्र्याचे प्रदर्शन गर्वाने करतात.’ एवढंच नाही तर, आई वडिलांच्या कमाईवर स्वतःचे स्वतंत्र विचार मांडतात…’ असं देखील कंगना पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत. ज्यामुळे वाद आता टोकाला पोहोचला आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in