• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अल्का याज्ञिक व्हिलचेअरवर; या दुर्मिळ आजारामुळे थेट श्रवण क्षमतेवर परिणाम

June 25, 2026 by admin Leave a Comment


ज्येष्ठ गायिका अल्का याज्ञिक यांना मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना एका व्यक्तीच्या मदतीने मंचापर्यंत नेण्यात आल्याचं पहायला मिळालं. कार्यक्रमानंतरही अल्का व्हीलचेअरवर दिसल्या होत्या. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपासून अल्का पार्श्वगायनात सक्रिय नाहीत. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित प्रकृतीविषयीची माहिती दिली. गेल्या दोन वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतापासून, सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहत असून कठीण काळाचा सामना करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर अल्का यांना नेमकं काय झालं आहे, याविषयी चाहत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला.

अल्का याज्ञिक यांना सेन्सोरिन्यूरल हिअरिंग लॉस (SNHL) हा आजार झाला आहे. हा एक दुर्मिळ श्रवणदोष आहे. एका व्हायरल अटॅकनंतर अनपेक्षितपणे ही स्थिती उद्भवली असून त्यामुळे त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा कानाच्या आतील भागाला किंवा श्रवण चेतासंस्थेला इजा पोहोचते, तेव्हा मेंदूला आवाजांवर प्रक्रिया करणं कठीण होतं. यामुळे सेन्सोरिन्यूरल हिअरिंग लॉस होतो. हा दुर्मिळ आजार वयोमानामुळे, संसर्गामुळे, एखाद्या ट्रॉमामुळे किंवा व्हायरल अटॅकमुळे होतो.

अल्का याज्ञिक यांची पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Alka Yagnik (@therealalkayagnik)

अल्का यांच्या बाबतीत डॉक्टरांनी या आजाराचा संबंध एका व्हायरल इन्फेक्शनशी जोडला आहे, ज्यामुळे त्यांना अचानक ऐकू येणं बंद झालं होतं. अशा प्रकरणांमध्ये त्वरित निदान आणि उपचार सर्वांत महत्त्वाचे असतात. उपचारास उशीर झाल्यास बरं होण्यावर परिणाम होऊ शकतो. 2024 मध्ये अल्का यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना या दुर्मिळ आजाराबद्दल माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं, ‘काही आठवड्यांपूर्वी विमानातून उतरल्यावर मला अचानक जाणवलं की मला काहीही ऐकू येत नाहीये. डॉक्टरांनी मला सेन्सोरिन्यूरल हिअरिंग लॉस नावाचा एक दुर्मिळ आजार असल्याचं निदान केलं.’

या आजाराचं निदान झाल्यापासून अल्का यांनी एकही गाणं रेकॉर्ड केलं नाही. त्यांनी माध्यमांसमोरही येणं टाळलं. पद्मभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं, ‘गेल्या दोन वर्षांपासून मी प्रसिद्धीच्या झोतातून, सार्वजनिक कार्यक्रमांमधून आणि माझ्या प्रवासातील गोष्टी इतरांपासून शेअर करण्यापासून दूर राहिले होते. मी माझ्या आरोग्याच्या कठीण काळातून जात होते, हे तुमच्यापैकी अनेकांना माहीत होतं. या सर्व काळात तुमचं प्रेम, प्रार्थना, संदेश आणि खंबीर पाठिंबा मला प्रत्येक टप्प्यावर मिळत गेला. आज देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्मभूषण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी बाहेर पडले, तेव्हा माझं मन कृतज्ञतेनं भरलेलं होतं. हा सन्मान मला अत्यंत नम्रतेची जाणीव करून देणार आहे.’





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 647 किमी रेंज अन् 28 मिनिटांत चार्ज! स्कोडाने लाँच केली आलिशान ‘Peaq’ इलेक्ट्रिक कार, भारतात कधी येणार?
  • 18000 कोटींची मालकीण लवकरच अडकणार विवाहबंधनात, जोरात सुरु आहे तयारी, 1000 पाहुणे राहणार उपस्थित
  • Ketan Agarwal : अखेर सिया-चेतनचा तो व्हिडीओ आला, केतनला मारण्याआधी हातात हात घालून…पाहून धक्काच बसेल!
  • Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने पोस्ट केली दुसरी जन्म तारीख, असं का ते जाणून घ्या
  • Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in