• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमेरिकेला मोठा दणका, जगाला ज्याची भीती तेच घडले, इराणचा सर्वात मोठा हल्ला, थेट अमेरिकेचे सैनिक..

September 2, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढताना दिसत आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केला. ज्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या. त्यातच आता या हल्ल्याला इराणकडून खतरनाक उत्तर देण्यात आले. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दावा केला की, त्यांनी जॉर्डनमधील अकाबा जवळील लष्करी तळावर मोठा हल्ला केला. हे अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला उत्तर होते. अमेरिकन मरीन सैनिकांच्या ठिकाणावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. हेच नाही तर जगाला हादरवणारा दावाही इराणकडून करण्यात आला. या हल्ल्यात अमेरिकेचे सैनिक मारले गेल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेचे सैनिक मारले गेले असतील तर अमेरिका शांत बसणार नाही. अमेरिका आणि इराण युद्ध पुन्हा भडकल्याची शक्यता आहे. जगाचा ज्याची भीती तेच घडताना पुन्हा दिसतंय.

इराणच्या आयआरजीसीनुसार, अमेरिकेच्या मरीन ठिकाणांवर मोठ्या संख्येने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे टाकली. तिथे मोठे धमाके झाले. हेच नाही तर इराणी प्रसारमाध्यम तस्निमने असाही दावा केला की, इराणच्या या हल्ल्यात अमेरिकेचे काही सैनिक ठार झाले. अमेरिकेचे लढाऊ हेलिकॉप्टर्स नष्ट करण्यात इराणला यश आले. मात्र, इराणच्या या दाव्यावर अमेरिकेने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. इराणच्या या हल्ल्याला अमेरिका उत्तर देणार. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवले होते. मात्र, पुन्हा अमेरिकेने एक हल्ला केला. ज्यानंतर इराणला भडकला आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबावे, अशी जगाची इच्छा आहे. मात्र, प्रत्यक्षात युद्ध भडकताना दिसत आहे.

इराणवर हल्ला झाला की, इराणकडून ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे हल्ले केले जातात. यावेळीही इराणने तेच केले. मात्र, यावेळी हल्ला थेट मरीन सैनिकांच्या ठिकाणांवर इराणने केला. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला की, थेट त्याचा परिणाम जागतिक बाजारातवर होतो आणि कच्च्या तेलाच्या किमती या भडकताना दिसतात. होर्मुज खाडी इराणकडून बंद केली जाते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
  • BCCI New Rule: फिट राहा, दुखापत असेल तर सरळ आता… बीसीसीआयचा नवा फर्मान, नियमच बदलले
  • पाकिस्तानने भारताकडे मागितली भीक, भारताचे थेट उत्तर, चीन आणि रशिया दोघेही..
  • Abhijeet Dipke : ‘बेधडक सांगतो…’; अभिजीत दीपकेंचं ‘आप’बद्दल मोठं विधान, काय काय सांगितलं?
  • Sonu Sood: सोनू सूद पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन थेट काठमांडूत पोहोचला, म्हणाला ‘उद्ध्वस्त झालेली आयुष्य पुन्हा उभी करणार’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in