• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘अमेरिका से आया यह चुपके-चुपके, नाम है उसका अभिजीत दिपके… रामदास आठवलेंच्या विधानाने संसदेत हशा

July 31, 2026 by admin Leave a Comment


राजधानी दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर संपूर्ण देशात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची चर्चा आहे. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, यावेळी सभागृहातही दिपके यांच्या नावाचा उल्लेख पहायला मिळाला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास विनोदी शैलीत अभिजीत दिपके यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे माझे लक्ष होते. तुम्हा सर्वांना माहिती आहे, ‘अमेरिका से आया यह चुपके-चुपके, नाम है उसका अभिजीत दिपके. त्यांच्या या शैलीदार वक्तव्यावर सभागृहातील खासदारांमध्ये एकच हशा पिकला.

संसदेत भाषण करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अभिजीत दिपके माझ्या समाजातील आहेत असं विधान केलं. ते म्हणाले, ‘अमेरिका से आया यह चुपके-चुपके, नाम है उसका अभिजीत दिपके. तो माझ्या समाजातील आहे. तो आंबेडकरवादीही आहे. अभिजीत दfपके यांनी उभारलेले आंदोलन महत्त्वाच्या विषयावर होते. सरकारने 25 दिवस आंदोलन सुरू असताना कोणताही लाठीमार केला नाही.’

लाठीचार्जचे समर्थन नाही…

पुढे बोलताना रामदास आठवले यांनी म्हटले की, संसदेवरील मोर्चादरम्यान दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लाठीचार्ज झाला, मात्र मी त्याचे समर्थन करत नाहीत. साधारणपणे पोलिसांवर दगडफेक झाली तर लाठीचार्ज केला जातो. संसदेला घेराव घालण्याची त्यांची घोषणा योग्य होती. त्यामुळे त्यांना रेल भवनपर्यंत येण्याची परवानगी देण्यात आली होती. ते 25 दिवस शांततेत आंदोलन करत होते. त्या काळात कोणत्याही पोलिसाने लाठीचा वापर केला नाही. मात्र संसदेकडे जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तरीही मी त्याचे समर्थन करत नाही. या घटनेची चौकशी व्हायला हवी.’

सरकारला CJP ला वाढता पाठिंबा दिसत होता

रामदास आठवले यांनी पुढे सांगितले की, ‘जंतर-मंतरवरील आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे मोदी सरकार सुरुवातीपासूनच पाहत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा घेतला.’ दरम्यान, आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

CJP चे आंदोलन कसे सुरू झाले?

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यानंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीची घोषणा केली होती. काही दिवसांतच हे आंदोलन Gen-Z मधील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आणि लाखो लोक त्याच्याशी जोडले गेले. यानंतर दिपके अमेरिकेतून भारतात परतले आणि जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केले. त्यांनी NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर आवाज उठवत तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनानंतर प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in