• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमितजी ‘मातोश्री’पासून जरा जपून, अमित ठाकरेंना कोणी दिला सल्ला? वाढदिवशीच…

May 24, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. अमितजींना मी खूप-खूप शुभेच्छा देतो, पण त्यांनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावं, असा सल्ला कदम यांनी अमित ठाकरे यांना दिला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत, एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, यावर देखील कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कदम नेमकं काय म्हणाले? 

कदम यांनी अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. अमिजींना मी खूप खूप शुभेच्छा देतो. पण त्यांनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावं, आज आदित्य तुम्हाला शुभेच्छा द्यायला आले आहेत, भाऊ म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या, पण हा भाऊ किती दिवस  टिकेल हे पहावं लागेल. आदित्य ठाकरे निवडून आले, पण तुम्हाला त्यांनी पाडलं, ‘मातोश्री’चं प्रचंड प्रेम आहे तुमच्यावरती असा खोचक टोला यावेळी कदम यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया 

दरम्यान एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे याच्या दिल्ली दौऱ्यामुळे  राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, यावर देखील कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता चालवायची असेल तर दिल्लीला पैसे आणण्यासाठी जावं लागतं. शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतात, उद्योजकांचेही काही प्रश्न असतात, त्यासाठी दिल्लीला जावं लागतं. मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे, ते उत्कृष्ट काम करत आहेत, मराठी माणसाला ठेच लागेल असं कुठलंही काम त्यांच्याकडून होत नाही, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो, ‘एकनाथजी आप आगे बढो, हम सब आपके साथ है’ असं यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी
  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in