
जळगावमधून मोठी बातमी समोर आली आहे. अमळनेर येथील संत सखाराम महाराजांच्या वाडी संस्थांनला भीषण आग लागल्याचे समोर आले आहे.
वाडी संस्थांनातून आगीचे मोठ-मोठे लोट बाहेर पडताना दिसत होते, या ठिकाणी मोठी गर्दी जमली आहे. ही आग नेमकी कशी लागली यासंदर्भातली माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच आग नियंत्रणात आणण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन बंब दाखल झाले, संस्थानामध्ये कोणी अडकले होते की नाही याची माहिती समोर आलेली नाही.
ही भीषण आग असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पत्रकार संघाच्या वतीने खाजगी टँकरला देखील आणण्यात आले होते. त्यामुळे आता आग नियंत्रणात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अमळनेरच्या वाडी संस्थानाला लागलेली भीषण आग तब्बल तासाभरानंतर आटोक्यात आली आहे. अमळनेर, शिरपूर, पारोळा, धरणगाव, चोपडा याबरोबरच इतर तालुक्यांमधील अग्निशमन बंबांच्या माध्यमातून आग आटोक्यात आली आहे.




Leave a Reply