• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिनेत्री स्वरा भास्कर आणि अविका गोर तापाने फणफणल्या, डेंग्यूचे झाले निदान

August 8, 2026 by admin Leave a Comment


बॉलीवुड अभिनेत्री स्वरा भास्कर हीची तब्येत अचानक बिघडली आहे. तिला डेंग्यू झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. स्वरा हीने स्वत:च तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याची माहिती तिच्या चाहत्यांसाठी दिली आहे. अचानक आलेल्या या वृत्ताने स्वरा भास्कर हीचे चाहते चिंतेत आहेत. सोशल मीडियावर स्वरा भास्कर यांची तब्येत लवकर नीट व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे. तसेच टीव्ही अभिनेत्री अविका गौर हीला देखील डेंग्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

स्वरा हिने दिले हेल्थ अपडेट

स्वरा भास्कर हीने इंस्टाग्रामवर तिचा रुग्णालयातील बेडवर असलेला फोटो शेअर केला आणि आश्चर्यचकीत करणारा मॅसेज पाठवला आहे. त्यात ती लिहिते की सर्वकाही इतक्या वेगाने झाले. डेंग्यू झाला आणि हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. स्वरा हीच्या या छोट्या संदेशाने तिच्या चाहत्यांना कळले की स्वरा हीला डेंग्यू झाला आहे. मात्र, तिला या आजाराचे निदान नेमका कधी झाले आणि ती किती दिवसांपासून रुग्णालयात आहे याची संदर्भात कोणतीही माहिती स्वरा हिने दिलेली नाही.

‘बालिका वधू’ फेम अविका गोर हीला देखील डेंग्यू

स्वरा भास्कर हीच्या आधी ‘बालिका वधू’ फेम टीव्ही अभिनेत्री अविका गोर ही देखील डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याची आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी आली होती. अविका हीचे पती मिलिंद चंदवानी यांनी अलिकडे त्याच्या पत्नीच्या तब्येती संदर्भात माहिती दिली होती. मिलिंद यांनी सांगितले होते की आजाराचे योग्य निदान होण्याच्या आधी अविका हिला सलग पाच दिवस तीव्र ताप आला होता. त्यानंतर तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले आणि तिला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिलिंद यांनी हे देखील सांगितले की शरीर साथ देत नाही तरीही अविका सतत काम करत आहे. तीव्र ताप येऊनही तिने एका प्रोजेक्टची शुटिंग पूर्ण केली आहे. तसेच कामासाठी दिल्लीला देखील गेली. मुंबईत आल्यानंतर तब्येत जास्त ढासळल्याने तिने टेस्ट केली आणि डेंग्यूचे निदान झाले. मिलिंद यांनी तिला ब्रेक घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आपल्यामुळे मेकर्सचे कोणतेही नुकसान होऊ नये अशी अविकाची इच्छा होती. त्यानंतर अविका हीने रुग्णालयाच्या बेडवरुन तिचा फोटो शेअर केला आहे.

स्टार्सची हालत पाहून चाहते निराश

स्वरा भास्कर आणि अविका गोर यांना रुग्णालयात पाहून चाहते नाराज झाले आहेत. बदलत्या हवामान आणि डासांच्या उपद्रवामुळे दोन्ही अभिनेत्रींना हा त्रास सहन करावा लागत आहे. दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या रिकव्हरी वा डिस्चार्ज संबंधित कोणतीही बातमी अपडेट केलेली नाही. स्वरा भास्कर अखेरीस टीव्ही शो ‘पति पत्नी और पंगा’ या मालिकेत तिचा पती फहाद अहमद याच्या सोबत दिसली होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ना दुधाची विक्री, ना पॅकेटचं दूध; भारताच्या या अनोख्या गावाबद्दल माहित्ये का ?
  • ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील अभिनेत्रीचा श्रावणी लूक चर्चेत; हिरव्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष
  • हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल
  • Video: श्रेयस अय्यरसोबत सेल्फी घेताना फॅन काय करून बसला! वैतागणार नाही तर काय करणार?
  • High Court : बायकोला काळी म्हटलं तर शिक्षा होईल का? हायकोर्टाने काय निकाल दिला?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in