
जवळपास अकरा वर्षांपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं होतं. या घटनेनं इंडस्ट्रीतील सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आत्महत्येपूर्वी त्यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती एका विशिष्ट व्यक्तीला देण्याची इच्छा व्यक्त करणारा संदेश मागे ठेवला होता.
रिपोर्ट्सनुसार, टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घराच्या भिंतीवर काळ्या मार्करने एक संदेश लिहिला होता. त्यात त्यांनी त्यांची संपत्ती कोणाला द्यावी, याविषयी लिहिलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे अभिनेत्याने त्यांची संपत्ती कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला देण्याऐवजी आपल्या मोलकरणीच्या नावावर करायचं ठरवलं होतं.
हे तिला द्या, तिला त्रास देऊ नका”, असं त्यांनी लिहिलं होतं. या अभिनेत्याचं नाव आहे रंगनाथ. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी हैदराबाद इथल्या त्यांच्या घरी आत्महत्या केली होती. 2015 मधील ही घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी नीरजा त्या दिवशी संध्याकाळी रंगनाथ यांना भेटायला त्यांच्या घरी गेली होती. तिने दरवाजा ठोठावलं, पण बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी अखेर दरवाजा तोडला. तेव्हा आतमध्ये ते मृतावस्थेत आढळले. रंगनाथ हे बऱ्याच काळापासून नैराश्यात होते, असंही म्हटलं जातं.
त्यादिवशी त्यांची मोलकरीण मिनाक्षी त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला आली आणि काम संपवून ती घरातून निघून गेली. रंगनाथ असं काही करतील याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांनी आपली सर्व संपत्ती मोलकरीण मिनाक्षीच्या नावावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे, हेसुद्धा तिला माहीत नव्हतं. इतकंच नव्हे तर रंगनाथ यांनी त्यांच्या संपत्तीचा तपशील भिंतीवर लिहून ठेवला होता.
रंगनाथ यांनी संपत्तीबद्दल असा निर्णय का घेतला, यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 10 ते 20 कोटी रुपयांदरम्यान होती. जवळपास 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी ही संपत्ती कमावली होती.






Leave a Reply