• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिजीत दिपके भडकले, थेट म्हटले, अजिबात बांगलादेश आणि नेपाळच्या..

August 5, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीला अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख मिळाली. अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले आणि मोठे आंदोलन उभे केले. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले. पण दुसऱ्या प्रयत्नात त्यांचे आंदोलन देशभरात पोहोचले. जेनझी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची संख्या वाढली. शेवटी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या दोन मागण्या मान्य केल्या आणि आंदोलन थांबले. अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले. कॉकरोच जनता पार्टी तूफान चर्चेत आली. अभिजीत दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंकेत जे घडले तेच भारतात घडवण्याचा डाव होता, असे सांगितले जातंय. त्यावर आता अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली.

अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बांगलादेश आणि नेपाळला बघण्याची अजिबात गरज नाही. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना अभिजीत दिपके यांनी बांगलादेशी लेखिका तसलीमा नसरीन यांनी केलेला आरोप खोटा आहे. अभिजीत दिपके याने म्हटले की, बांग्लादेश आणि नेपाळचे नाव घेत आमच्या आंदोलनाला बदनाम केले जातंय.

आम्ही त्यांच्यापेक्षा खूप जास्त वेगळे आहोत. आम्ही दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान संविधानाचे पालन केले. शांततापूर्ण आमचे आंदोलन होते. मुळात म्हणजे बांगलादेश किंवा नेपाळकडे बघण्याची आम्हाला अजिबात गरज नाही. आमच्याकडे महात्मा गांधी यांचे विचार आहेत. भारतातील विद्यार्थी आक्रमक नव्हते. संयमाने दिल्लीतील आंदोलन सुरू होते.

पुढे अभिजीत दिपके याने म्हटले की,बांगलादेश आणि नेपाळमध्ये झालेल्या आंदोलनाची आठवण त्यांना कदाचित पोलिसांकडून करण्यात आलेल्या वर्तनामुळे झाली असेल. हात पाय तुटले पण त्यांनी शेवटपर्यंत आपल्या संयम सोडला नाही. आम्ही शांतपणे जंतर मंतवर आंदोलन केले. त्यामुळे मुळातच आमच्या आंदोलनाची तुलना नेपाळ आणि बांगलादेशच्या आंदोलनाशी करणे चुकीचे आहे. अभिजीत दिपके यांनी भाजपावर काही आरोप केले. विद्यार्थ्यांचा छळ जंतर मंतरवर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in