• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिजीत दिपके भडकले, थेट भाजपच्या राज्यसभा खासदाराच्या राजीनाम्याची मागणी, पुन्हा आंदोलन?

August 14, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन उभारले. या आंदोलनाचा भाजपाला फटका बसला. थेट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन देशभरात सुरू होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हे आंदोलन थांबले. त्यामध्येच NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉच्या दीक्षांत समारंभासाठी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना निमंत्रित करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला. हा वाद अधिकच चिघळताना दिसतोय. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी करण्याबाबत आणि त्यांना वकील म्हणून नोंदणीपासून रोखण्याबाबतचा आदेश बार कौन्सिल ऑफ इंडियाने मागे घेतला आहे. या विद्यार्थ्यांना वकील म्हणून नोंदणीपासून रोखण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. ज्याने खळबळ उडाली. कॉकरोच जनता पार्टीने या निर्णयाला विरोध केला आणि आंदोलन उभारण्याची धमकी दिली. ज्यानंतर कौन्सिल त्यांचा हा निर्णय मागे घेतला.

आता सीजेपीकडून अत्यंत मोठी मागणी केली जात आहे. सीजेपीने बीसीआयचे अध्यक्ष आणि भाजपचे राज्यसभा खासदार मनन कुमार मिश्रा यांच्या राजीनाम्याची केली. निर्णय मागे घेण्याबाबत मनन मिश्रा यांनी एक्सवर दिलेल्या माहितीवर उत्तर देताना सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी लिहिले, मित्रांनो हे साध्य झाले आहे… तरुणांसाठी आणखी एक मोठा विजय… पण लढा मात्र सुरूच राहील…

अभिजीत दिपके यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले की, मनन कुमार मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची वेळ आली आहे का? यावर कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते साैरभ दास यांनी म्हटले की, मनन कुमार मिश्रा यांच्याबद्दल काही गोष्टी पुढे येत आहेत, त्या नक्कीच चिंताजनक आहेत. त्यांचा लगेचच राजीनामा झाला पाहिजे. व्यवस्थित चालणाऱ्या लोकशाहीत असेच घडते.

कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आलेल्या विरोधानंतर काउन्सिलने असा निर्णय घेतला आहे की स्टेट बार काउन्सिल्स सर्व विद्यार्थ्यांना वकील म्हणून नोंदणीकृत करू शकतात. विद्यापीठाचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, आता त्यानंतरही हे प्रकरण चांगलेच चिघळताना दिसत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!
  • नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
  • मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
  • मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in