
अभिजीत दिपके आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले, यावेळी मित्र परिवार आणि नातेवाईक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर अभिजीत दिपके यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ गेटवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
यानंतर अभिजीत दिपके आपल्या घरी पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी त्याचे हार घालून आणि ओवाळून स्वागत करण्यात आले.
अभिजीत दिपके यांच्या घरी स्वागतासाठी त्यांचे नातेवाईक, मित्र पोहोचले होते. त्याचबरोबत माध्यमांचे प्रतिनिधीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अभिजीत दिपके यांच्या यांच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता आगामी काळातही जनतेच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार दिपके यांनी केला आहे.




Leave a Reply