• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अनिल परब यांना मोठा दिलासा, ‘त्या’ मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता

July 30, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पालिका अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परब यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जून 2023 मध्ये वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाची शाखा पडल्यावरून अभियंत्याला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी अनिल परब, माजी नगरसेवक सदानंद परब यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनिल परब यांची निर्दोष मुक्तता

मुंबई महापालिकेच्या पालिकेच्या एच पूर्व विभागाच्या कार्यालयात सहाय्यक अभियंता (परिरक्षण) अजय पाटील यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी अनिल परब यांच्यासह इतरांवर सरकारी कामात अडथळला आणल्याचा आणि अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा वाकोला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यावेळी सदा परब यांच्यासह इतरांना अटकही करण्यात आली होती. आज या प्रकरणाचा निकाल आला असून सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

जून 2023 मध्ये वांद्रे येथील ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय पालिकेनं अनधिकृत म्हणून पाडलं होतं. त्याच्या निषेधार्थ परब आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ एच-पूर्व प्रभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी पक्ष कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असतानाही आमचं पक्ष कार्यालय उद्ध्वस्त करणारे अधिकारी कोण होते? असं परब आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलं होतं.

या मोर्चावेळी पालिकेचे काही कर्मचारी पुढे आले होते, त्यावेळी कार्यकर्त्यांनी बीएमसीचे सहाय्यक अभियंता अजय पाटील यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना धमकी दिली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, तसेच अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणाचा निकाल लागला असून परब आणि इतरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in