• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अचानक बिकिनी परिधान करण्याची मागणी, अभिनेत्रीने दिला नकार, 2 तास बंद पडलेलं सर्व शूटिंग

June 27, 2026 by admin Leave a Comment


60 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून आपल्या दमदार अभिनयाने आणि खलनायिकेच्या लक्षवेधी भूमिकांनी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री बिंदू यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. या वेळी त्यांनी 1973 साली प्रदर्शित झालेल्या ‘जोशीला’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला एक रंजक प्रसंग सांगितला. त्यांच्या एका निर्णयामुळे तब्बल दोन तास शूटिंग थांबले होते, असा खुलासा त्यांनी केला.

‘जोशीला’ या चित्रपटात बिंदू यांच्यासोबत देव आनंद, हेमा मालिनी आणि राखी गुलजार यांसारखे दिग्गज कलाकार होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. युट्यूबर विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत बिंदू यांनी सांगितले की, एका सीनसाठी त्यांना अचानक बिकिनी परिधान करण्यास सांगण्यात आले. मात्र, चित्रपटाच्या तयारीदरम्यान याबाबत त्यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.

त्या म्हणाल्या, ‘मी बिकिनी घालण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे मी जवळपास दोन तास शूटिंग थांबवून ठेवले. सेटवर पोहोचल्यानंतरच मला या सीनबद्दल समजले. मी यशजींना स्पष्टपणे सांगितले की, याची मला आधी कल्पना दिली असती तर बरे झाले असते.

यश चोप्रांनी दिला विश्वास

बिंदू यांनी सांगितले की, त्यांच्या संकोचाची जाणीव होताच यश चोप्रांनी त्यांना धीर दिला. त्यांनी सांगितले की, शक्य तितके पाण्यात राहूनच दृश्य चित्रीत केले जाईल आणि कॅमेऱ्यात फक्त बाजूचे व मागील अँगल्स वापरले जातील.

या प्रसंगात देव आनंद मात्र शांतपणे सर्व घडामोडी पाहत बसले होते. बिंदू म्हणाल्या, शूटिंग जवळपास दोन तास थांबले होते. त्या काळात देव आनंदजी काहीही बोलले नाहीत. ते काय विचार करत असतील, याचाच मी विचार करत होते. शेवटी बिंदू यांनी यश चोप्रांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून ते सीन साकारले. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सिनेमॅटोग्राफरला सीन कसे दिसत आहे अशी विचारणा केली.

याबाबत त्या म्हणाल्या, त्यांनी मला सांगितले की, ‘काळजी करू नका, तुम्ही चांगल्या दिसत आहात. सीन अजिबात अश्लील वाटत नाही. त्यांच्या या शब्दांनंतर मला मोठा दिलासा मिळाला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार
  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in