• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अग्निवीरांसाठी गुड न्यूज; आता 25 टक्क्यांहून अधिक जवान होणार पर्मनंट, काय आहे नेमका प्लान?

July 6, 2026 by admin Leave a Comment


अग्नीवीरांसाठी लवकरच खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. तिन्ही सशस्त्र सैन्य दलाने 4 वर्षांनंतर 25 हून अधिक अग्नीवीरांना नोकरीत कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नौदलाने सर्वाधिक जवान कायम करण्याची मागणी केली आहे. तर लष्कर आणि हवाई दलाने 25 टक्क्यांवरून 50 टक्क्यापर्यंत वाढ करण्याची मागणी केली आहे. परंतु या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं नाही.

अग्निपथ योजनेत सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलं होतं की, 4 वर्षांच्या सेवेनंतर मेरीटच्या आधारावर काही जवानांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव होता. यासाठी 25 टक्के अग्नीवीर जवान कायम ठेवणार असल्याचे सांगण्यात आले होते. सुरुवातीला सर्वांना अग्निपथ योजनेतून मुक्त केलं जाईल. त्यानंतर सशस्त्र दलात रुजू होऊ इच्छिणाऱ्या अग्निवीरांनाच सामील केले जाते. ही निवड मेरीटच्या आधारावर केली जाते .

अग्नीवीरांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव 

इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, ‘नौदलाने सर्वाधिक अग्निवीरांना कायम करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नौदसाने 25 टक्क्यांहून थेट 75 टक्के अग्निवीरांना कायम करण्याचा प्रस्ताव सादर केलाय. तर लष्कर आणि हवाई दलाने 50 टक्क्यांपर्यंत अग्निवीरांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्यांच्या मागणीवर अद्याप कोणताही प्रतिक्रिया मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निवीरांचा 25 टक्के वाढवला नाही, तरी काही विशिष्ट युनिट्समध्ये सैनिक समाविष्ट केले जाऊ शकतात. परंतु ही मर्यादा 25 टक्क्यांपर्यंत ठेवली जाईल.
गेल्या वर्षी सुमारे 70000 अग्निवीर प्रशिक्षणासाठी सैन्यात दाखल झाले. पुढील वर्षी सैन्यातील अग्निवीरांची संख्या वाढवण्यासाठी रिक्त जागा 90 हजारांपर्यंत वाढवल्या जाऊ शकतात. सैन्यातील 1.8 लाख सैन्याची कमतरता दूर करण्यासाठी सैन्य तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.

अग्निपथ योजना काय आहे?

2022 साली सुरू झालेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना अग्नीवीर म्हणून सशस्त्र दलांमध्ये भरती केले जाते. या योजनेमुळे तरुणांना सशस्त्र दलांमध्ये काम करण्याची संधी मिळते. या योजनेअंतर्गत अग्निवीरांची 4 वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलांमध्ये भरती केले जाते. . त्यांच्यासाठी सशस्त्र दलात एक विशेष पद दिले जाते. ते इतर पदापेक्षा वेगळे असते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Aamir Khan Marriage: आमिर खानच्या तिसऱ्या लग्नवार सलमान खानचं विधान चर्चेत; भाईजान जे म्हणाला ते ऐकून सगळ्यांनाच आलं हसू
  • Lock Upp 2 : गरिबांनी मुलं पैदा केल्यासा गरिबी वाढेल, पण श्रीमंतांनी…, उद्योजकाच्या बायकोचं वादग्रस्त वक्तव्य
  • Mumbai Rain : मुंबईत धडकी भरणारे वारे वाहणार, ताशी 80 ते 90 किलोमीटर… रेड अलर्ट जारी, गरज असेल तरच घराबाहेर पडा
  • IND vs ENG: वैभवसाठी गंभीर लाडक्या खेळाडूच्याच विरोधात गेला, भर मैदानात घातला वाद; व्हिडिओ जोरदार व्हायरल
  • Mumbai-Pune Connectivity Disrupted | पुण्याचं मुंबईशी कनेक्शन तुटलं! दुसऱ्या बोगद्यावरही… सर्वात मोठी अपडेट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in