• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अखेर राज्यसभा निवडणुकीत तो घातपात झाला! काँग्रेसच्या सर्वात चर्चेतल्या उमेदवाराचा अर्ज बाद; ऐनवेळी मोठा गेम

June 9, 2026 by admin Leave a Comment


Meenakshi Natarajan : महाराष्ट्रासह देशातही सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा आहे. या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यापासू ते अर्जांच्या पडताळणीपर्यंत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काँग्रेसकडून ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद होणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानले जात आहे.

नेमकं काय घडलं?

मीनाक्षी नटराजन यांनी काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी मध्य प्रदेशातून हा अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांच्या अर्जावर भाजपाने आक्षेप घेतला होता. नटराजन यांनी आपल्या अर्जात त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या तक्रारींची माहिती आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही, असा आरोप भाजपाने केला होता. हाच आक्षेप ग्राह्य धरून नटराजन यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे झाला अर्ज बाद

हैदराबाद मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात नगरसेविका ए श्रीलता यांनी मीनाश्री नटराजन यांच्याविरोधात एक याचिका दाखल केलेली आहे. शिवकुमार रेड्डी नावाच्या व्यक्तीन माझी छेड काढली. त्या व्यक्तीला नटरजान यांनी संरक्षण दिले, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. भारतीय न्याय संहितेच्या कलम 356 ,61,45 तसेच इतर कलमाअंतर्गत त्यांच्याविरोधात खटला उभा करावा, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती. याबाबबत मीनाक्षी नटराजन यांना नोटीसही पाठवण्यात आली होत. याच प्रकरणाची माहिती नटराजन यांनी आपल्या अर्जात दिली नव्हती. भाजपाने यावरच आक्षेप घेतला होता.

आता उरले भाजपाचे तीन उमेदवार

दरम्यान, मध्य प्रदेशात एकूण तीन जागांवर राज्यसभेसाठी निवडणूक होत आहे. या तीन जागांसाठी एकूण चार उमेदवार होता. त्यापैकी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने आता फक्त तीन उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत. हे तिन्ही उमेदवारी भाजपाचेच आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नकोच बाबा, त्याच्यासारखं मला अजिबात खेळायचं नाही… ऋषभ पंतबद्दल ध्रुव जुरेलने असं विधान का केलं?
  • Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?
  • MPSC पेपर फुटीच्या मुद्यावर मनसेने विचारला एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न, विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना
  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in