• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी…

August 8, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अधिकाऱ्यांना जात प्रमाणपत्र रद्द करण्याचे संकेत बावनकुळे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला. यावर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आरोप फेटाळले आहेत.

बावनकुळे म्हणाले, “माझं रक्तच नाही जे कोणी माझ्यावर मराठा आरक्षण संदर्भात आरोप करतात ते त्यांना लखलाभ आहे.” तसेच कोणाच्याही विरोधात जाणे किंवा अन्याय करणे हा आपला स्वभाव नसल्याचे त्यांनी सांगितले. “मराठा समाजाच्या जवळचा मी आहे. जसा मी ओबीसीच्या घरातला आहे तसा मराठ्याच्याही घरातला आहे. त्यामुळे परिवारामध्ये आम्ही असं करत नाही,” असे ते म्हणाले.

मराठा समाजाला त्यांचा हक्क देण्यासाठी सरकार काम करत असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण रद्द करण्याचा घाट सुरू असल्याच्या आरोपावर त्यांनी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

“मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये आणि ओबीसीला न्याय देताना मराठा वर अन्याय होऊ नये,” अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भीक मागत मागत मृत्यू… घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना… सर्वांनाच बसला धक्का
  • स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी आई – वडिलांनी ही मूल्य जपलीच पाहिजे
  • युट्युब गेमचा २४ तासांचा खतरनाक चॅलेंज, घरातून दोन लहान मुले गुपचुप पळाली, नंतर काय झाले ?
  • Kriti Sanon: रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून झालेल्या वादावर अखेर क्रिती सनॉनने सोडलं मौन; महिलांनी कसे कपडे घालावेत हे..
  • Abhijeet Dipke: पैसे कमी मिळायचे म्हणून अभिजीत दिपके याने सोडली होती आम आदमी पार्टी, मोठा खुलासा, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in