• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अक्षय कुमार सोबत काम करणार कळताच अक्षरा सिंगची भन्नाट रिॲक्शन, म्हणाली – मी 5 वेळा वॉशरूमला..

June 12, 2026 by admin Leave a Comment


‘वेलकम टू द जंगल’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच (11 जून) लाँच झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण कास्ट एकत्र दिसली. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी अक्षय कुमार, राजपाल यादव, दिशा पटानी, रवीना टंडन आणि इतर कलाकारांसोबत भोजपुरी स्टार अक्षरा सिंग ही देखील दिसून आली. या चित्रपटातील एका गाण्याद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात अक्षरा सिंग आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित केलेलं ‘घिस घिस घिस’ (Ghis Ghis Ghis) हे अतिशय उत्साही भोजपुरी-हिंदी गाणं आहे. प्रेक्षकांकडून या गाण्याला मोठी पसंती मिळत असून सध्या ते यूट्यूबवर चांगलंच गाजत आहे, ट्रेंडही करत आहे. ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात अक्षराने तिच्या गाण्याबद्दल भाष्य केले. तिने अक्षयसोबत डान्सही केला.

काय म्हणाली अक्षरा ?

यावेळी अक्षराला एक सवाल विचारण्यात आला. अक्षय कुमार सोबत तुला हा चित्रपट, गाणं ऑफर झालं, तेव्हा तुझी प्रतिक्रिया कशी होती ? त्यावर अक्षरा जे बोलली ते ऐकून सगळेच अवाक झाले. ती म्हणाली ( ऑफरबद्दल ) ते ऐकताच मी तब्बल 5 वेळा वॉशरुमला जाऊन आले. मी एवढी एक्सायटेड होते. कारण माझ्यासाठी हे (अक्षयकुमारसोबत काम करणं) स्वप्नवतच होत. मी लहानपणापासूनच ‘सरांना’ पाहत आले आहे. त्यांचं “मैं खिलाडी तू अनाडी” हे गाणं बिहारमधील प्रत्येक मुलाच्या अगदी काळजात रुजलेलं आहे. म्हणूनच, माझ्यासाठी ही एक खूप मोठी संधी होती, असं अक्षरा म्हणाली.

‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अक्षरा हिने अक्षय कुमारसोबत डान्सही केला. बॉलिवूड कलाकारांच्या मांदियाळीत अक्षरा सिंगने आपल्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा आनंदाचा क्षण तिच्यासाठी अत्यंत भावूक करणारा होता; बॉलिवूडमधील तिच्या पदार्पणाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.

कधी रिलीज होणार चित्रपट ?

‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the Jungle) या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर 29 जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे अनेक वर्षांनंतर अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जोडी पाहायला मिळणार आहे; 90 च्या दशकात अतिशय हिट जोडी असलेल्या, या दोन कलाकारांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहणं चाहत्यांसाठी खूपच आनंदाचं ठरेल. अनेक बड्या कलाकारांचा समावेश असलेल्या या चित्रपटाकडून बॉक्स ऑफिसवर मोठ्या कमाईची अपेक्षा आहे. मात्र प्रदर्शनानंतर प्रेक्षकांकडून या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in