• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अंडी दरांनी गाठली उच्चांकी पातळी; मुंबई-पुण्यात डझनभर अंडीसाठी किती रुपये मोजावे लागणार?

July 18, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम आशियातील संघर्षाचा भारताला मोठा फटका बसत आहे. या संघर्षामुळे मागील दोन महिन्यांपासून भारतीयांना इंधनदरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. इंधनदरवाढीमुळे भाजीपालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर आता अंडी दरांनीही उच्चांकीची पातळी गाठली आहे. मुंबई, पुण्यात अंड्याचे दर महागल्याने सर्वसामान्यांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहे.

मुंबई, पुण्यात अंड्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यातील असह्य तापमानामुळे सरासरी १५ टक्के कोंबड्या मरण पावल्याने अंडी देण्यायोग्य कोंबड्यांचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील अंडी उत्पादनात सरासरी १५ टक्क्यांनी घट झालीये. तसेच कोंबड्याच्या लहान पिलांसाठी चार ते पाच महिन्यांची प्रतिक्षा करावी लाते. त्यामुळे मुंबई, पुणयात अंड्याची किरकोळ विक्री 8 ते 10

शिवाय लहान पिलांसाठी चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने मुंबई, पुण्यात अंड्याची किरकोळ विक्री ८ ते १० रुपयांवर गेली आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यात अंड्याचं एक नग हे ८ रुपयांनुसार डझनभर अंडीसाठी 96 रुपये मोजावे लागत आहे. तर पुढील काही महिने अंड्याचे दर चढे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा असह्य उन्हाळ्यामुळे कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. यावेळी उन्हाळ्यात राज्याचे तापमान सरासरी ३५ अंशांच्या वर गेले होते. त्यामुळे अनेक कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या.

देशात साधारणपणे ३८ अंशांच्या वर तापमान गेल्यानंतर कोंबड्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढते. वाढत्या तापमानामुळे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पोल्ट्री चालकांनी अनेक प्रयत्न केले होते. त्यानंतरही महाराष्ट्रसह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश पंजाब आदी राज्यांमध्ये कोंबड्या मरण पावल्या.

कोंबड्यांचं खाद्य महागलं

तत्पूर्वी, कोंबड्यांना देण्यात येणारं खाद्य महागला आहे. कोंबड्यांना खाद्य म्हणून देण्यात येणारा मका, सोया पेंड आणि इतर आवश्यक घटक परदेशातून आयात केले जातात. या आयातीमुळे त्यांचं खाद्य महाग झालं आहे. त्यात विशेष म्हणजे पश्चिम आशियातील संघर्षाच्या परिणामामुळे खाद्याच्या आयात आणि पुरवठ्यावर परिणाम झालाय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल
  • ‘दायरा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी करीना कपूर भडकली, सँडल दाखवत म्हणाली की…
  • Explainer : आता नेपाळचं व्हायरल घर, तेव्हा केदारनाथचं मंदीर, महाप्रलयात दोघेही शाबूत कसे? वाचा A टू Z
  • पैशासाठी अशा ठिकाणी जाऊ नका.. अर्चना पूरन सिंह यांना ‘लेटेंट’मध्ये पाहून भडकला प्रसिद्ध कॉमेडिअन
  • या वनस्पतीची पानं म्हणजे सापांवर जालीम उपाय; पुडी बांधून फक्त एकदा घरात ठेवा, पुन्हा कधीच साप येणार नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in