• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अंडरवॉटर फोटोग्राफी आणि 6500mAh बॅटरी, भारतात लाँच झाला टेक्नोचा ‘हा’ दमदार फिचर्स असलेला स्मार्टफोन

July 17, 2026 by admin Leave a Comment


टेक्नोचा नवीन स्मार्टफोन Tecno Camon 50 Ultra 5G ग्राहकांसाठी भारतात लाँच करण्यात आला आहे. तर हा फोन ॲमेझॉनवरून खरेदी करता येईल. या फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर 2 मीटर डेप्थमध्ये 30 मिनिटांपर्यंत वाटर रेसिस्टेंस सपोर्ट आहे. तसेच, धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP68, IP66, IP69, आणि IP69K असे रेटिंग मिळाले आहे. या फोनमध्ये ऑटो-झूम, एआय आर्ट गॅलरी, 70 मिमी नॅचरल पोर्ट्रेट शॉट्स, अंडरवॉटर फोटोग्राफी आणि एआय ट्रॅव्हल शॉट्स यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

भारतात टेक्नो कॅमोन 50 अल्ट्रा 5G ची किंमत

या टेक्नो स्मार्टफोनची किंमत 39 हजार 999 रूपये आहे. तर इंटरोडक्टरी ऑफरचा भाग म्हणून 21 आणि 22 जुलै रोजी फोनच्या खरेदीवर ग्राहकांना लाँच कूपन सवलत मिळेल. कूपन सवलत मिळाल्यानंतर या फोनचा 39 हजार 999 रूपयांचा व्हेरिएंट 36 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध होईल. याशिवाय तुमच्या सोयीसाठी 6 महिन्यांचे नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहेत.

या किमतीत हा टेक्नो फोन पोको एक्स8 प्रो, वनप्लस नॉर्ड सीई6, रियलमी जीटी 7टी, मोटोरोला एज 70 फ्यूजन, विवो टी5 प्रो 5जी, ओप्पो एफ33 प्रो 5जी आणि सॅमसंग ए36 5जी यांसारख्या स्मार्टफोन्सना कडवी टक्कर देईल.

टेक्नो कॅमोन 50 अल्ट्रा 5G वैशिष्ट्ये

डिस्प्ले: या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट असलेला 6.78-इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच या फोनमध्ये 1.5K ProXDR कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले आणि स्क्रीनच्या संरक्षणासाठी ड्युअल कॉर्निंग गोरिला ग्लास 7i आहे. याव्यतिरिक्त हा नवीनतम टेक्नो मोबाईल 2800Hz टच सॅम्पलिंग रेट देतो.

प्रोसेसर: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्टिमेट चिपसेट देण्यात आला आहे.

बॅटरी: या डिव्हाइसमध्ये 6500 mAh क्षमतेची बॅटरी असून 45 W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे.

कॅमेरा: मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा सोनी लायटिया 700सी सेन्सर असून हा फोन 5x सुपर झूम स्नॅप कॅप्चरची सुविधा देतो. यात 50 मेगापिक्सेलचा 3x टेलीफोटो सेन्सर, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो लेन्स देखील आहे. हा फोन 100x सुपर झूमलाही सपोर्ट करतो. समोरच्या बाजूस 50-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. समोरचे आणि मागचे दोन्ही कॅमेरे 4के व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood: भूकंप, पाऊस की हिमस्खलन.. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराचं खरं कारण समोर
  • Rule Change : LPG ते विमानतळापर्यंत…! 1 सप्टेंबरपासून देशात होणार 5 मोठे बदल, काय काय महागणार?
  • सायबर अधिकाऱ्याने यावेळी घरातून उचललं पण.. समय रैनाच्या टोलेबाजीने मुख्यमंत्र्यांनाही हसू अनावर, Video नक्की पाहा
  • Ankit Baliyan: प्रसिद्ध गायकावर जिमबाहेर झाडल्या 20 गोळ्या; मृतदेह रस्त्यावर ठेवत कुटुंबीयांचा आक्रोश
  • Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्ग कोपला, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर, ही माहिती तयार ठेवा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in