• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WTC 2027: भारताच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ, दुसरा सामना किती महत्त्वाचा?

August 19, 2026 by admin Leave a Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत एकूण 9 संघ खेळत आहेत. त्यापैकी इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तर अव्वल दोन स्थानी जागा मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, बांग्लादेश, भारत आणि श्रीलंका यांच्यात रस्सीखेंच आहे. तीन संघ वगळता इतर संघांच्या कसोटी मालिकेतील निकालावर गुणतालिकेत मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलिया पराभूत करत गुणतालिकेत मोठा उलटफेर केला होता. त्यानंतर भारताने श्रीलंकेला पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेचं चित्र बदललं आहे. श्रीलंकेला पराभूत करत भारतीय संघ आताही पाचव्या स्थानावरच आहे. पण विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. तर 12 गुणही मिळाले आहेत. आता भारत आणि बांगलादेशच्या दुसऱ्या सामन्याकडे लक्ष लागून आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल काय?

भारताचा दुसरा कसोटी सामना श्रीलंकेशी 23 ऑगस्टपासून कोलंबोत होणार आहे. हा सामना भारताला काही करून जिंकणं भाग आहे. हा सामना जिंकला तर भारताच्या विजयी टक्केवारी फरक पडेल. भारताने श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला तर विजयी टक्केवारी 57.58 टक्के होईल. पण पाचव्या स्थानावरच राहिल. यासाठी ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत करावं लागेल. जर तसं झालं तर भारत चौथ्या स्थानावर पोहोचल आणि बांग्लादेश 55.56 विजयी टक्केवारीसह पाचव्या स्थानावर घसरेल. पण दोन्ही सामने ड्रॉ झाले तर बांगलादेशला फायदा होईल आणि चौथ्या स्थानावरच राहिल.

भारताचं अंतिम फेरीचं गणित काय?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणातालिकेत ऑस्ट्रेलिया 77.78 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर, दक्षिण अफ्रिका 75 टक्के विजयी टक्केवारीसह दुसऱ्या, न्यूझीलंड 72.22 टक्के विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण 8 सामने शिल्लक आहे. भारताने आठ पैकी 7 सामने जिंकले तर टॉप 2 मधील स्थान पक्कं होईल. इतकंच काय तर सहा विजय, एक ड्रॉ आणि एक सामना गमावला तरी काही फरक पडणार नाही. पण दोन सामन्यात पराभव झाला तर गणित बिघडेल. त्यामुळे भारतासाठी प्रत्येक सामना करो या मरोची स्थिती आहे. त्यात न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत 3-0 ने पराभूत करणं सोपं नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in