
आयसीसी वुमन्स टी२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला. ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मोलिन्यू नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर म्हणाली की, आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत. सुंदर दिवस आहे, त्यांच्यावर सुरुवातीलाच दबाव आणायचा आहे. खेळपट्टीमध्ये फारसा बदल होईल असे वाटत नाही. काही बदल नाहीत. कालच्या सरावानंतर पेझ (पेरी) बरी झाली. खास दिवस आहे. मुलींना दोन दिवसांची सुट्टी मिळाली. गेल्या दोन दिवसांपासून सराव सुरू केला आहे.
इंग्लंडची कर्णधार सायव्हर-ब्रंट ‘मी पण गोलंदाजी करणार होते. खेळपट्टी ताजी आहे. अंतिम सामन्यात धावफलकावर धावा असणे ही काही वाईट गोष्ट नाही. आमच्या संघात कोणताही बदल नाही. त्या अनुभवाचा आधार न घेणे माझ्यासाठी मूर्खपणाचे ठरेल.’
दोन्ही संघांची प्लेइंग ११
इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): एमी जोन्स (यष्टीरक्षक), डॅनी वायट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), अॅलिस कॅप्सी, हेदर नाइट, फ्रेया केम्प, डॅनिएल गिब्सन, शार्लट डीन, लिन्से स्मिथ, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन बेल.
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): जॉर्जिया वोल, बेथ मूनी (यष्टीरक्षक), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिन्यू (कर्णधार), किम गार्थ, लुसी हॅमिल्टन
Leave a Reply