• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Weather Update : मोठी गुड न्यूज, राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

September 12, 2026 by admin Leave a Comment


राज्यात पावसाने दडी मारली आहे. गेल्या तीस दिवसांपेक्षाही अधिक काळापासून महाराष्ट्रात पाऊसच झालेला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. एवढंच नाही तर पाऊस न झाल्यास जलसाठे देखील संकटात येण्याची शक्यता आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय  झाला आहे. राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दबाचा पट्टा विदर्भाकडून कोकणाकडे सरकरणार आहे.  यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे. राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काय आहे पंजाबराव डख यांचा नवा अंदाज?

‘शनिवारपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. विदर्भात 11 सप्टेंबरपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस रविवार, सोमवार, मंगळवार 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या काळात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील 24 तासांमध्ये विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. ज्यामध्ये चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यात आता हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा सुरुवात झाली आहे,’ असा हवामान अंदाज यावेळी पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे.

‘पुढील 24 तासांमध्ये विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला जिल्हा, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर कोकणात देखील पावसाचा अंदाज आहे. राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा हा विदर्भातून मराठवाड्याकडे आणि मराठवाड्याकडून उत्तर महाराष्ट्रात त्यानंतर कोकणाच्या दिशेनं सरकणार आहे. 13 आणि 14 सप्टेंबर रोजी नाशिक आणि मुंबई या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात बारा सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या काळात पावसाचा जोर राहणार आहे. या काळात राज्यातील वेगवेगळ्या भागात पाऊस पडले,’ असा अंदाज देखील हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आयटी इंजिनिअर व्यायामात मग्न, भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू, पुण्यात धक्कादायक घटना!
  • Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
  • Weather Update : मोठी गुड न्यूज, राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
  • India vs Afghanistan T20 : वैभव घरेलू मैदान गाजवणार त्याआधीच आली वाईट बातमी, चाहत्यांची निराशा होणार?
  • Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in