• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Virat Kohli-Travis Head : मॅचनंतरही राडा… विराट कोहली भडकला, भरमैदानात ट्रॅव्हिस हेडला…Vidoe व्हायरल

May 23, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 चा सीझन आता शेवटच्या टप्प्यात येताना दिसत आहे. या सीझनमधील 67 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला पराभूत करून या सीझनच्या सलामीच्या सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. हा सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा होती, पण तसं काहीच झालं नाही. मात्र, या सामन्यामुळे एका अशा संघर्षाला तोंड फुटले आहे, जो प्लेऑफमध्येही पाहायला मिळू शकतो. सामन्यादरम्यान बंगळूरुचा स्टार फलंदाज आणि हैदराबादचा स्फोटक सलामीवीर ट्रॅव्हिस हेड यांच्यात झालेल्या जोरदार शाब्दिक चकमकीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र, हे एवढ्यावरचं थांबलं नाही तर सामन्यानंतर विराटचा राग दिसून आला. कारण सामना संपल्यावर सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन करणाऱ्या विराटने ट्रॅव्हिस हेडकडे बघितलही नाही,विराटने त्याच्याशी हँडशेक करण्यास नकार दिल्याने एक नवा वाद निर्माण झाल्याचं दिसलं.

कालच्या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात बाचाबाची झाली. सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला 55 धावांनी पराभूत केले. मात्र सामना संपल्यानंतरही ऑस्ट्रेलियन खेळाडूवरील कोहलीचा राग कायम होता; त्याने हेडशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला आणि त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अनेकांनी कोहलीच्या या वागणुकीवर नाराजी दर्सवत टीका केली आहे.

नेमकं काय झालं ?

कालच्या मॅचदरम्यान कोहली जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा त्याच्यात आणि ट्रॅव्हिस हेडदरम्यान वाद झाला. काल टॉस जिंकून सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान किशन (79), अभिषेक शर्मा (56) आणि हेनरिक क्लासेन यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर एसआरएचने 255 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला केवळ 200 धावाच करता आल्या.

विराट कोहली संतापला

सामन्यात मैदानावरच झालेला वाद सर्वांनी पाहिलाच, पण मॅच संपल्यानंतरही कोहलीचा राग शांत झाला नाही. तो आपल्या संघासोबत सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी आला. त्याने पॅट कमिन्सशी हस्तांदोलन केले, त्यानंतर ट्रॅव्हिस हेडनेही हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. पण कोहलीने मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तो तसाच पुढे निघून गेला.

 

Virat Kohli ignored Travis Head when he tried to shake hands with him after the match 😭#SRHvsRCB pic.twitter.com/urAY79pYQ0

— Indian Cricket (@IPL2025Auction) May 22, 2026

ही घटना टीव्हीवर प्रसारित होताच, तो व्हिडिओ सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला. कोहलीच्या या वागणुकीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली असून, त्याचं वागणं खिलाडूवृत्तीला धरून नसल्याचे म्हटलं जात आहे. खरंतर, सामन्यानंतर खेळाडू सहसा आपले मतभेद विसरून, नाइलाजाने का होईना, हस्तांदोलन करतात, पण विराट कोहलीने तसे करण्यास दिलेला नकार हा चाहत्यांना रुचला नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकेकाळी दीपिका पादुकोणसाठी दरवाजा खोलायची माजी मुख्यमंत्र्यांची नात, आज आलिया भट्टला देतेय टक्कर
  • ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाचा मोठा निर्णय, थेट..
  • मुलगा अन् सुनेशी वाजलं, वडिलांनी अंगावरच चढवली कार.. अख्खं शहर हादरलं
  • Maharashtra News LIVE : भोंदू अशोक खरातविरोधातील खटल्याची आजपासून सुनावणी
  • मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांना फोन करत एकनाथ शिंदे यांनी दिला मोठा शब्द, थेट खुलासा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in