• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video : हातात आयफोन, चहाचा कप आणि…डोंगरावर संपलेल्या कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ

August 22, 2026 by admin Leave a Comment


ज्ञानेश्वर लोंढे – छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर शुक्रवारी दुपारी जी घटना घडली ती ऐकून अनेकजण हादरले. आयफोनच्या मुद्यावरून कुटुंबात झालेला वाद, मुलाने डोंगरावरून उडी मारण्याचा घेतलेला निर्णय, त्याला वाचवताना वडिलांचाही झालेला मृत्यू आणि ते पाहून त्याच्या आईनेही उडी मारून दिलेला जीव. अवघ्या काही क्षणात एका कुटुंबाची झालेली वाताहत पाहून अनेकांचे डोळे पाणावले नाहीत तर नवल. 19 वर्षीय कुणाल चांदगुडे आत्महत्या करण्यासाठी खवड्या डोंगरावर गेल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेले वडील मुलीधर चांदगुडेही खाली कोसळले. आणि ते पाहून आई संगीता यांनीही त्याच डोंगरावरून उडी मारून जीव दिला. वडील आणि मुलाच्या कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मात्र अख्ख्या राज्याला हादरवणाऱ्या या घटनेने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

या दुर्दैवी घटनेत ज्यांचा मृत्यू झाला तोच कुणाल आणि त्याची आई संगीता यांचे काही जुने व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमधून आई आणि मुलामधील अतूट नातं, जिव्हाळा आणि एकमेकांबद्दल असलेली आपुलकी प्रकर्षाने समोर येत आहे. त्यामुळे हे व्हिडिओ पाहताना नागरिकांच्या डोळ्यांतही पाणी येत असून, या कुटुंबावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

हातात चहाचा कप, आयफोन आणि निवांत गप्पा.. तो व्हिडीओ समोर

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कुणाल आपल्या आईसोबत निवांतपणे चहा घेताना दिसत आहे. आई-मुलातील साध्या गप्पा, सहज संवाद आणि त्या क्षणातील आपलेपणा या व्हिडिओतून स्पष्ट जाणवतो. रोजच्या आयुष्यातील हा साधा क्षण आज मात्र अनेकांसाठी भावूक करणारी आठवण ठरताना दिसत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या जुन्या आठवणींमुळे कुणाल आणि त्याची आई संगीता यांच्यातील नात्याची भावनिक बाजू नागरिकांसमोर आली आहे. आई-मुलाच्या प्रेमाचे हे क्षण आज त्यांच्या आयुष्यातील आठवणी म्हणून पाहिले जात आहेत. खवड्या डोंगरावरील कालच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर हे व्हिडिओ आता समोर आल्याने त्यातील प्रत्येक क्षण पाहून डोळे न पाणावतील तरच नवल.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in