• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video : पाकिस्तानच्या युट्यूबरने भारताचा तिरंगा जाळायला सांगितलं, लायटर दिलं आणि भलतंच घडलं; व्हिडीओ एकदा पाहाच!

August 16, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि पाकिस्तानी या दोन शेजारी राष्ट्रांचा स्वातंत्र्य दिन कालपरवा साजरे झाले. दोन्ही देशांच्या फाळणीच्या जखमा आजही भरलेल्या नाहीत. पाकिस्तान १४ ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. तर भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दोन्ही शेजारील देशात नुकतेच पहलगाम हल्ल्यावरुन ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सैन्य चकमक नुकतीच झाली आहे. या दोन्ही देशातील संबंध सध्या तणावाचे आहेत. अशात पाकिस्तानी युट्युबरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत युट्युबरने पाकिस्तानातील नागरिकांना असा टास्क दिला आहे. तो पाहून पाकिस्तानी नागरिक अचंबित होत आहेत. काय आहे हा टास्क नेमका पाहूयात…

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील दुश्मनी सर्वांनाच परिचित आहे. या दोन्ही शेजारी देशात पहलगाम हल्ल्यानंतर अधिक संबंध ताणलेले आहेत. भारताने मैत्री-संवाद आणि दहशतवाद एकत्र नांदू शकत नाही असे पाकिस्तानला वारंवार समजावले आहे. इतकी दुश्मनी असूनही भारतातील लोक पाकिस्तानी गायकांवर प्रेम करतात तर पाकिस्तानी भारतीय अभिनेत्यांवर आणि बॉलीवूडवर…दोन्ही देश एकमेकांची तुलना करीत असतात. एकमेकांवर शेखी मिरवणताना दिसतात.

पाकिस्तानच्या एका युट्युबरने एक म्हटला तर विचित्र टास्क पाकिस्तानी जनतेला करायला दिल्याचा व्हिडीओ त्याने व्हायरल केला आहे. यात हा युट्युबर पाकिस्तानी नागरिकांना आधी एक लायटर हातात देतो नंतर म्हणतो एक वस्तू मी तुम्हाला जाळायला देणार आहे. जर हा टास्क तुम्ही पूर्ण केला तर तुम्हाला मी पैसे देईन. त्यानंतर हा युट्युबर हळूच एक प्लास्टीकचा भारतीय झेंडा त्यांच्या हातात देतो आणि त्यांना जाळायला सांगतो. मात्र, हा झेंडा पाहाताच पाकिस्तानी नागरिक आधी थोडे वरमतात आणि हडबडतात.

कोणीच टास्क पूर्ण करत नाहीत..

कोणीच हा फ्लॅग जाळण्यास तयार होत नाही. हा युट्युबर म्हणतो की तुम्ही हा पडोसी देशाचा  झेंडा ( परचम ) जाळला तर तुम्हाला तिप्पट काय, चौपट पैसे देऊ.. पण कोणताही पाकिस्तानी नागरिक तयार होत नाही. एक जण म्हणतो की, “अरे भाई क्यो जलानेका. उसे से क्या फायदा होगा..माना की दुश्मनी हैं. पर पहले एकही थे ना दोनो.” एक महिला म्हणते की, यह उस देश की शान है. अगर हम उनका परचम जलाऐगे, तो कल वोह हमारा जलाऐंगे, तो अपने भी मुल्क का अपमान होगा ना. नही करना भाई ये…त्यानंतर हा पाकिस्तानी युट्युबर या नागरिकांचे कौतूक करताना दिसत आहे.

येथे पोस्ट वाचा…

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in