• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video : गोविंदा आणि सुनीता विभक्त होणार? फॅमिली कोर्टात लेकासह सुनिता दिसताच चर्चांना उधाण

August 19, 2026 by admin Leave a Comment


Sunita Ahuja At Family Court : बॉलीवुडचा ‘हीरो नंबर वन’ गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात पुन्हा मोठा वादळ आलं आहे, 37 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर हे दोघेही वेगळे होणार असल्याच्या चर्चा आता फक्त गॉसिपपुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून उलट त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं असे संकेत दिसू लागले आहेत. बुधवारी सकाळी सुनीता अहुजा या, त्यांचा मुलगा यशवर्धन याच्यासह मुंबईतील फॅमिली कोर्टातून बाहेर पडताना दिसल्या, त्यांचा व्हिडीओ समोर येताच आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. हे प्रसिद्ध जोडपं आता खरंच कायदेशीररित्या विभक्त होणार का, असाच सवाल सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओनंतर उपस्थित होत आहे.

कोर्टाबाहेर शांतता, मुलाने हातच जोडले

इंटरनेटवर हा व्हिडीओ सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून त्यामध्ये सुनीता अहुजा या फॅमिली कोर्टातून त्यांच्या गाडीच्या दिशेने जाताना दिसल्या. एरवी कॅमेरामन, पापाराझी किंवा मीडियासमोर अतिशय मोकळपणाने, बिनधास्त अंदाजात बोलणाऱ्या सुनीता यावेळी मात्र अतिशय शांत आणि थोड्या तणावात दिसत होत्या. त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मुलगा यशवर्धनही थोडा त्रस्त वाटत होता. व्हिडीओ किंवा फोटो काढू नका अशी विनंती त्याने पापाराझींनाजोडून विनंती केली. मात्र एवढं होऊनही पापाराझी थांबले नाहीत, ते पाहून त्याला राग आला आणि तो थोडं मोठ्याने ओरडतानाही दिसला. एवढंच नव्हे तर, ‘कोर्टात मी केक कापायला आले होते’ असं म्हणत जाता जाता सुनीता यांनी टोमणाही मारला. दोघांचंही मौन आणि तिथून पटापट निघून जाण्याची घाई पाहून अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

दीर्घकाळापासून सुरू होता वाद

अभिनेता गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यातील तणावाच्या चर्चा काही नवीन नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये सोशल मीडिया पोस्ट आणि मुलाखतींच्या माध्यमातून एकमेकांवर टोमणे मारण्याचा प्रकार सुरू होता. सुनीताने अनेकदा गोविंदावर विश्वासघात आणि विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोपही केले होते. काही दिवसांपूर्वीच गोविंदा हा राणी स्वर्णकारसोबत विमानतळावर दिसला होता. विशेष म्हणजे, त्याने पापाराझींसमोर तिची ओळखही करून दिली. या घटनेनंतर दोघांमधील वाद आणखी चर्चेत आला.

यापूर्वीही गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, गेल्या वर्षी दोघांनी गणपती पूजेला एकत्र हजेरी लावत, या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं सांगितलं होतं. आता मात्र सुनीता या कौटुंबिक न्यायालयाबाहेर दिसल्याने या प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण मिळाल्याचं दिसत आहे.

‘बिग बॉस 20’मध्ये गोविंदाची एंट्री अडचणीत?

दरम्यान, गोविंदा हा ‘बिग बॉस 20’ या शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनाही जोर आला होता. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद आणि चर्चांमुळे निर्माते, त्याला शोमध्ये घेण्यास उत्सुक होते, असं म्हटलं जात होतं. मात्र, जर गोविंदा आणि सुनीता यांच्यातील वाद आता न्यायालयात गेला असेल, तर अशा परिस्थितीत रिॲलिटी शोमध्ये सहभागी होणं हे गोविंदासाठी कठीण ठरू शकतं. या संपूर्ण प्रकरणावर गोविंदा किंवा सुनीता अधिकृतपणे काही बोलतात का, स्पष्टीकरण देतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in