• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastushastra : तुम्हालाही घरात सतत ही गोष्ट दिसते का? तर आजच सावध व्हा , असतात गरिबीचे संकेत

May 21, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काही मोठे बदल घडणार असतात, तेव्हा ते अचानक घडत नाहीत, तर असे बदल घडण्यापूर्वी त्या व्यक्तीला विशिष्ट संकेत मिळत असतात. हे संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजे. जर हे संकेत आपण ओळखले तर आपण वेळीच सावध होऊ, त्यामुळे भविष्यातील मोठं नुकसान टळतं. समजा एखादा व्यक्ती अचानक श्रीमंत होणार असेल तर त्याला काही विशिष्ट संकेत मिळतात. जसं की सकाळी उठल्यानंतर भरद्वाज पक्षाचं दर्शन होतं, सकाळी उठताच शंखनाद ऐकू येतो, कधी-कधी देवी देवता स्वप्नात येतात. घरावर पैशांचा पाऊस पडत आहे, असं स्वप्न पडतं. हे सर्व शुभ संकेत असतात, याचाचा अर्थ असा होतो, की लवकरच तुम्ही श्रीमंत होणार आहात. तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे, मात्र जेव्हा तुमचं काही नुकसान होणार असतं, तुम्ही आजार पडणार असता, किंवा तुमच्या आयुष्यात एखादं मोठं आर्थिक संकट येणार असतं, तेव्हा देखील तुम्हाला काही संकेत मिळतात, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

घरात गरिबी येण्याचे संकेत – जर तुमच्या घरात वारंवार कोळ्यांचे जाळे दिसू लागले तर सावध व्हा कारण हे घरात गिरीबी येण्याचे संकेत असू शकतात, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. त्यामुळे घरात कधीही कोळ्याची जाळी होणार नाहीत, याची काळजी घ्या. जर समजा घरात कोळ्याची जाळी झालीच तर त्यांना ताबडतोब नष्ट करा, अशा जाळ्यांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. अशा जाळ्यांमुळे घरात विविध प्रकारचे दोष निर्माण होतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.

घर स्वच्छ ठेवा – वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार जे घर स्वच्छ असतं, ज्या घरात कुठेही अडचण नसते, पसारा नसतो, अशा घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो, अशा घरात कधीही पैशांची कमी जणवत नाही, कुटुंबप्रमुखाला कधीही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही. घराची तिजोरी सदैव पैशांनी भरलेली राहते. त्यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवावं असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in