• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : बेडरूमशी संबंधित या तीन चूक कधीही करू नका, अन्यथा आयुष्यातील सुख, शांती होऊ शकते गायब

August 21, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कशी दूर होऊ शकते? यासाठी देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा कामावरून थकून घरी येता, तेव्हा तुमच्यासाठी आराम करण्याचं तुमचं हक्काचं ठिकाण म्हणजे बेडरूम असतं. तुम्ही दिवसभरातून अधिक काळ हा बेडरूममध्येच व्यतीत करतात, त्यामुळे तुमच्या बेडरूममध्ये जशी ऊर्जा असेल तसा तिचा प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो. जर तुमच्या बेडरूममध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा सकारात्मक प्रभाव हा तुमच्या मनावर पडतो, तुमची प्रगती होते, मनाला शांती लाभते. झोपेतून उठल्यानंतर तुम्ही दिवसभर फ्रेश असता, तुमचा दिवस देखील चांगला जातो.

या उलट तुमच्या बेडरूममध्ये जर निगेटीव्ह ऊर्जा असेल तर त्याचा देखील तुमच्या मानावर परिणाम होतो. तुमच्या मनाची दिवसभर चिडचिड होते. तुमचा दिवस चांगला जात नाही, कामात लक्ष लागत नाही, महत्त्वाची काम खोळंबतात. त्यामुळे बेडरूममध्ये निगेटीव्ह ऊर्जा निर्माण होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं.  त्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

स्वच्छता – तुमची बेडरूम नेहमी स्वच्छ असावी, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, झोपेतून उठल्यानंतर अंथरूणाच्या नीट घड्या घालाव्यात, कपडे बेडवर अस्त-व्यस्त स्वरुपात पडलेले नसावेत. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

जड सामान – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडखाली कधीही जड किंवा लोखंडी सामान असू नये, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, मनात अस्वस्थता वाढते. दिवसभर चिडचिड होते, कामात लक्ष लागत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

जेवण – वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कधीही जेवण करू नये, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. ज्याचा फटका हा तुम्हाला बसू शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in