• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : देवपूजा करताना कधीही करू नये या 5 चुका , होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान

June 10, 2026 by admin Leave a Comment


कोणत्याही घरी देवघर हे घरातील सर्वात मोठं सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं. देवघरातून नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत होत असते, या ऊर्जेचा सकारात्मक परिणाम हा तुमच्या आयुष्यावर पडतो आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून तुमच्या घराचं संरक्षण होतं. परंतु वास्तुशास्त्रानुसार देवपूजेचे काही नियम असतात. त्याचं पालन केलं तरच तुम्हाला इच्छित फळाची प्राप्ती होते. मात्र तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने पूजा केली तर त्याचा नकारात्मक परिणाम देखील तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने पूजा केल्यास तुम्हाला अपेक्षित फळाची प्राप्ती होत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण देवपूजा करताना वारंवार होणाऱ्या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. देवपूजा करताना काय करावं? आणि काय करू नये? याबद्दल जाणून घेणार आहोत.

या चुका टाळाच – अनेक जण देवपूजा करताना देवाला फक्त फुलं अर्पण करतात आणि प्रार्थना करतात. परंतु जेव्हा तुम्ही देवपूजा करतात, तेव्हा देवाला फुलासोबतच गंध आणि नैवेद्य देखील अर्पण करावा. त्यानंतर देवाची आरती करावी. देवपूजा करताना देवाला कधीही नेवैद्य अर्पण करण्यास विसरू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

मंदिरातील घंटी – सामान्यपणे जेव्हा आपण एखाद्या मंदिरात प्रवेश करतो, तेव्हा आपण तेथील घंटी वाजवतो, परंतु अनेकांना मंदिरातून बाहेर जाताना देखील घटी वाजवण्याची सवय असते, परंतु वास्तुशास्त्रामध्ये हे अशुभ माण्यात आलं आहे.

दिशा – अनेकांना देवपूजेनंतर पूर्वी कोणते देव कुठे ठेवले होते, हेच आठवत नाहीत. त्यामुळे अनेक देवांची जागा बदलली जाते. मात्र अशी देवाची जागा वारंवार बदलू नये, त्यामुळे तुमच्या आयुष्यात अस्थिरता येते असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पूजा करताना नेहमी या गोष्टीची काळजी घ्यावी.

पूजा करताना गणपतीला कधीही तुळस वाहू नये, तसेच महादेवाच्या पिंडीला देखील कधीही तुळस वाहू नये. गणपतीला लाल फुल अर्पण करावं, तसेच महादेवांना पांढरं फूल आणि बेलाचं पान अर्पण करावं. भगवान विष्णूला तुळस अर्पण करावी, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये – जर तुम्हाला देवपूजेसाठी तुळशीची पानं लागत असतील आणि त्या दिवशी जर एकादशी असेल तर चुकूनही तुळशीची पानं तोडू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Girija Oak : गिरिजाला सर्वकाही संपल्यासारखं वाटलं तेव्हा…, आई झाल्यानंतर अभिनेत्रीला बसलेला मोठा धक्का, पहिल्यांदाच म्हणाली…
  • ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदेंचे थेट आदेश..
  • Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे..सगळे रात्रीचे खेळ..आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी लागणारे शब्द
  • पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्… पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता…
  • किसिंग सीन दरम्यान 20 वेळा रिटेक, रागात नंतर अभिनेत्रीने जे केलं ते ऐकून व्हाल थक्क

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in