• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Suryawanshi : भावा तू कोणत्या बॉलरला घाबरतो? वैभव सूर्यवंशीचं उत्तर ऐकून सगळेच अवाक्, 4 शब्दांत विषय संपवला!

July 30, 2026 by admin Leave a Comment

Vaibhav Suryawanshi : भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. वैभव अवघ्या 15 वर्षांचा असला तरीही मैदानावर आला तो धावांचा पाऊस पडतो. आता नुकतेच त्याचा भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान वैभवने आयपीएल 2025 मध्ये तुफानी फलंदाजी करून सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यानंतर आयपीएल 2026 मध्येही धावांचा डोंगर रचून त्याने आपले कौशल्य पुन्हा एकदा दाखवून दिले. त्याचाच परिणाम म्हणून आता त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, याच वैभव सूर्यवंशीने फलंदाजी करताना कोणत्या गोलंदाजाची भीती वाटते, या प्रश्नांचं उत्तर दिलं आहे. त्याच्या या उत्तराची सगळीकडेच चर्चा होत आहे.

आयपीएलमध्ये तुफानी खेळी

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये 16 सामन्यांत एकूण 776 धाली केल्या विशेष म्हणजे त्याला या हंगामात ऑरेंज क्रप मिळाली. आयपीएलमध्ये त्याने जसप्रीत बुमराह आणि जोश हेजलवूड यांनाही सळो की पळो कडून टाकलं होतं. आता जगभरातील सर्वोत्तम गोलंदाजांवर त्याने भाष्य केलंय. त्याचे हे उत्तर ऐकून अनेक दिग्गज क्रिकेटपटू चकित झाले आहेत.

वैभव सूर्यवंशीने नेमकं काय उत्तर दिलं?

वैभव सूर्यवंशीने राजस्थानमधील एका प्रझेंडरने विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. याच संवादामध्ये वैभवला तुला सर्वाधित भीती कोणत्या गोलंदाजाची वाटते? तुला कोणत्या गोलंदाजाचा सामना व्हायला नको, वाटते? असे प्रश्न त्याला विचारण्यात आले. याच प्रश्नाचे त्याने अवघ्या चार शब्दांत उत्तर दिले. या प्रश्नांचे “मला कोणत्याही गोलंदाजाची भीती वाटत नाही,” असं उत्तर वैभवने दिलंय. त्यानंतर प्रझेंटरने आयपीएलमध्ये कोणतातरी गोलंदाज असेल ना? ज्याची तुला भीती वाटते? असा प्रश्न वैभवला केला. याचेही उत्तर त्याने नाही,असेच दिले. त्यानंतर प्रझेंटरने हसत हसत जोप्रआ आर्चर याचे तरी नावे घे, असे विधान केले. त्यावरही वैभव सूर्यवंशीने मला त्याचीही भीती वाटत नाही, असे रोखठोक उत्तर दिले.

दरम्यान, त्याचे हे उत्तर म्हणजे त्याच्यातील आत्मविश्वास असल्याचे बोलले जात आहे. वैभवचे आंतरराष्ट्रीय करिअर आता सुरू झाले आहे. तो अवघ्या 15 वर्षांचा आहे. भविष्यात तो अनेक विक्रम नोंदवणार असल्याचे क्रिकेट क्षेत्रातील जाणकारांकडून सांगितले जाते.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं
  • आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
  • खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
  • Govindan and Sunita Ahuja : गोविंदाने पत्नी सुनिताला पुन्हा केलं फॉलो, रुमर्ड गर्लफ्रेंडबाबत काय? फ्रेंडलिस्टमध्ये आहे का ?
  • मोठी बातमी! NIA ची देशभरात छापेमारी, पुणे शहरातही शिजत होता भयंकर कट? दहशतवाद प्रकरणात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in