• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

US Iran Conflict : इराणचा मोठा विजय, अमेरिकेला गुडघ्यावर आणलं, ट्रम्प यांची माघार?

April 20, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अमेरिकेनं स्ट्रेट ऑफ होर्मूजवर नाकेबंदी केली आहे, तर इराणने देखील स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जाहाजांसाठी बंद केला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये अमेरिका आणि इराण आमने-सामने आले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला होता, आता हा युद्धविराम संपण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक आहेत. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर लगेचच इराण आणि अमेरिकेमध्ये पाकिस्तानात शांती वार्ता झाली होती. मात्र त्यावेळी त्यावर कोणताही तोडगा निघू शकला नव्हता.

दरम्यान चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर इराण आणि अमेरिकेमधील तणाव अधिक वाढल्याचं पहायला मिळालं. आता अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम संपणार आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना देखील फोन केला होता. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन पाऊलं माघार घेतल्याचं पहायला मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे. जर इस्लामाबादमध्ये होणाऱ्या दुसऱ्या फेरीमध्ये काही तोडगा निघाला तर आपण शांती वार्तासाठी इराणच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहोत, मी त्यांच्यासोबत आमने-सामने चर्चा करेल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस आणि विशेष दूत स्टीव विटकॉक हे दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार आहेत, या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. अमेरिकेच्या बाजूने अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस आणि विशेष दूत स्टीव विटकॉक हे पाकिस्तानमध्ये जाणार आहेत, मात्र अजूनही इराणकडून यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे चर्चा होणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

तर दुसरीकडे ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना फोन केला होता, त्यांनी देखील ट्रम्प यांना सुनावलं आहे, जोपर्यंत अमेरिका स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील नाकेबंदी हटवत नाही, तोपर्यंत इराणसोबत चर्चा होऊच शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. यावर उत्तर देताना त्याबाबत विचार करू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांनी दोन पाऊल माघर घेतल्याचं बोललं जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पालकांच्या निधनानंतर त्यांचा TDS रिफंड कसा मिळवायचा? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
  • GT vs MI: सूर्यकुमार यादव वेगवान चेंडूचा ठरला बळी, रबाडाने टाकलेल्या चेंडूचा टप्पा पडताच उडवल्या दांड्या
  • कार खरेदीची सुवर्णसंधी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त कार लोन
  • Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष… पीडितांना छळणाऱ्या आठवणी अजूनही ताज्या
  • कमी EMI चा मोह टाळा! दीर्घमुदतीच्या कर्जावर भरावे लागेल दुप्पट व्याज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in