• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

UPI युजर्सना मोठा झटका; आता ऑनलाइन पेमेंटसाठी पैसे मोजा? एका ट्रांजेक्शनसाठी लागणार किती चार्ज?

August 4, 2026 by admin Leave a Comment


सरकार युपीआय पेमेंटमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत 'पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम कायद्यात सुधारणा करणारे विधेयक सादर केले आहे. नवं विधेयक युपीआय ट्रांजेक्शनवर शुल्क आकारण्यासाठी कायदेशीर चौकट तयार केली जात आहे. सरकारने अद्याप तात्काळ कोणतेही शुल्क लागू केलेले नाही. यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, नव्या विधेयकाचा सर्वांवर परिणाम होणार नाही. एका प्रस्ताव असा आहे की, 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ट्रान्जेक्शनवर 0.3 टक्के आणि 0.5 टक्के शुल्क आकारण्याचा विचार केला जात आहे साधारण हे शुल्क 1.5 कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांना लागू होण्याची शक्यता आहे. छोटे दुकानदार, किराणा दुकानदार, छोट्या व्यावसायिकांना या धोरणातून वगळले जाण्याची शक्यता आहे.

एका वृत्त संस्थेच्या रिपोर्टनुसार, कोणत्याही प्रकारचं शुल्क न आकरता युपीआय सेवा दिल्याने व्यवसाय मॉडेल तयार करणे कठीण होऊ लागले आहे. शुल्क न आकारल्यामुळे कोणताही महसूल मिळत नाही, असं पेमेंट कंपन्यांचे म्हणणं आहे.

या कारणामुळे युपीआय सेवेत नवीन तंत्रज्ञान, सुरक्षेसाठी सिस्टिम किंवा इतर डेव्हलेपमेंटबाबत गुंतवणूक करणे शक्य होत नाही, असेही कंपन्यांचे म्हणणं आहे.

युपीआय ट्रांजेक्शनवर शुल्क केले, तर पेटीएम आणि पाइन लॅब्ससारख्या फिनटेक कंपन्यांना शुल्कातून वार्षिक 5000 कोटी ते 10000 कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळवता येऊ शकतो. त्याचबरोबर दंड कसा आणि कितीपर्यंत आकारला जावा, याविषयी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in