• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

TVK Vijay : थलपती विजय यांचं टेन्शन वाढलं, सरकार अडचणीत ?, समर्थन करणाऱ्या महत्वाच्या पक्षाकडून पाठिंबा काढून घेण्याची धमकी

May 20, 2026 by admin Leave a Comment


तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालाने संपूर्ण राज्याचे नव्हे तर अख्ख्या देशाचे लक्ष वेधून घेतलं. सध्या तामिळनाडूच्या राजकारणाची सर्वत्र चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत थलपथी विजय यांचा टीव्हीके (TVK) हा पक्ष सर्वात मोठा ठरला आणि इतरांच्या पाठिब्यांच्या सहाय्याने विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली, ज्या सोहळ्याची सगळीकडे चर्चा रंगली होती. मात्र नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तामिळनाडूच्या राजकारणातील राजकीय गोंधळ तीव्र झाल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री थलपथी विजय यांच्या तामिळनाडू वेत्री कळघम (TVK), या पक्षाला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI-M) आपला पाठिंबा काढून घेण्याची उघडपणे धमकी दिली आहे.

जर टीव्हीकेने प्रमुख विरोधी पक्ष एआयएडीएमकेसोबत (AIADMK) कोणतीही तडजोड केली किंवा त्यांना मंत्रिमंडळात सामील करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तात्काळ आमच्या निर्णयावर पुनर्विचार करू, असं सीपीआय(एम)ने स्पष्ट केलं आहे.

त्या आश्वासनांची करून दिली आठवण

माकपा (CPI-M)चे ज्येष्ठ नेते षण्मुगम यांनी या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया देत, टीव्हीके प्रमुख विजय यांना त्यांच्या (निवडणूकीतील) आश्वासनांची आठवण करून दिली. षण्मुगम म्हणाले, “तामिळनाडूच्या जनतेने यावेळी सत्ताधारी डीएमके आणि माजी एआयएडीएमके या दोन्ही पक्षांच्या विरोधात जाऊन एक स्पष्ट आणि नवा कौल दिला. राज्यात एक स्वच्छ सरकार स्थापन व्हावं, केवळ यासाठीच डाव्या पक्षांनी आणि व्हीसीकेने बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे” असं ते म्हणाले.

क्लीन गव्हर्नन्सवरही प्रश्न उपस्थित ?

माकपा(एम) नेत्याने विजय यांच्यावर थेट निशाणा साधला. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी (विजय) “प्रशासन पूर्णपणे स्वच्छ करण्याचे” आणि भ्रष्टाचारमुक्त पर्याय देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे, जर त्यांनी सरकार चालवण्यासाठी एआयएडीएमकेच्या (AIADMK) गटाची मदत घेतली किंवा त्यांच्या नेत्यांना मंत्रिमंडळात पदं दिली, तर तो तामिळनाडूच्या जनतेचा मोठा विश्वासघात आणि जनादेशाचा अपमान ठरेल, असं त्यांनी सुनावलं.

” पण मला खात्री आहे की टीव्हीकेचं नेतृत्व या थराला जाणार नाही. पण जर त्यांनी एआयएडीएमकेला सरकारचा भाग बनवण्याचा किंवा त्यांच्या मदतीने सरकार चालवण्याचा कोणताही प्रयत्न केला, तर सीपीआय(एम) निश्चितपणे आपल्या पाठिंब्याचा पुनर्विचार करेल आणि सरकार अडचणीत येऊ शकतं” असा डायरेक्ट इशाराच शनमुगम यांनी विजय यांना दिला.

मात्र शनमुगम या वक्तव्यानंतर तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता सर्वांच्या नजरा मुख्यमंत्री विजय यांच्या पुढील वाटचालीवर लागल्या आहेत. कारण त्यांनी पाठिंबा काढून घेतल्यास विजय यांच सरकार पत्त्याच्या बंगलयाप्रमाणे क्षणार्धात कोसळू शकतं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ते गाणं पाहिलं अन् शाहरुखने घराच्या खिडक्या उघडणे केले बंद, 58 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये
  • Kangana Ranaut: समन्स आलं अन् होणारे सासू-सासरेच पळाले..; लग्नाबाबत कंगनाने सांगितला धक्कादायक किस्सा
  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in