• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Turning Point : 18 चेंडूत फिरली मॅच, मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, गुजरातच्या हातून असा निसटला सामना

April 21, 2026 by admin Leave a Comment

IPL 2026 मध्ये मुंबईने इंडियन्सने पराभवचा दुष्टचक्र अखेर भेदलं आहे. स्पर्धेतील 30 व्या सामन्यात काल मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर तब्बल 99 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ वर आला आहे. या सामन्यात मुंबईच्या संघाने 199 धावा केल्य, ज्यात 101 धावा करत शतक झळकावणाऱ्या तिलक वर्माचा सिंहाचा वाटा होता. पाच वेळा चॅम्पियन बनलेल्या मुंबई इंडियन्सचा संघ कालच्या विजयामुळे पुन्हा एकदा रूळांवर परतला आहे.

या हंगामातील आपल्या सहाव्या सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सचा तब्बल 99 धावांनी पराभव केला. यापूर्वी मुंबईने सलग चार सामने गमावले होते. त्यामुळे कालचा विजय हा त्यांच्यासाठी संजीवनीसारखाच ठरला म्हटला तरी अतिशयोक्ती होणार नाही. एवढंच नव्हे तर, या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ 10 व्या स्थानावरून 7 व्या स्थानावर पोहोचला आहे.

मात्र असं असलं तरी कालचा विजय हा मुंबईसाठी सोपा नव्हता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कर्णधार हार्दिक पांड्या नाणेफेक हरला आणि त्याला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. मुंबईची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली, त्यांनी 50 धावांतच तीन गडी गमावले. फलंदाजीचा वेगही लक्षणीयरीत्या मंदावला होता. डावाच्या 17 व्या षटकापर्यंत मुंबईची धावसंख्या केवळ 141 होती. गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबई केवळ 160 किंवा 170 धावाच करू शकेल असे वाटत होते, पण शेवटच्या तीन षटकांत जे घडले त्याने बाजी पलटवली.

18 चेंडूत 58 धावा

गुजरातविरुद्ध मुंबईच्या संघाची संथ फलंदाजी पाहिल्यावर, ते 199 धावांपर्यंत पोहोचतील अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. मात्र, शेवटच्या 18 चेंडूंमध्ये तिलक वर्माने (45 चेंडूंत 101 धावा) 58 धावा जोडून आपल्या संघाची पडती बाजू सावरलली. आणि हाच क्षण मुंबईसाठी सामन्यातील निर्णायक क्षण, अगदी टर्निंग पॉईंट ठरला म्हणा ना.. कारण 200 धावा करण्याचा मानसिक दबाव गुजरातच्या फलंदाजांवर वाढत गेला. त्यानुळे, पटापट, वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात गुजरातची आघाडीची फलंदाजी पूर्णपणे कोसळली.

असा पलटला सामना

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनाही या गोष्टीचा फायदा झाला. विशेषतः अश्विनी कुमारने कहर केला. अश्विनीने मुंबईसाठी 4 षटकांत 24 धावा देऊन 4 बळी टिपले. मिचेल सँटनर आणि अल्लाह गझनफर यांनीही प्रत्येकी 2 बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी नव्या चेंडूने प्रत्येकी 1 बळी घेत गुजरातला गारद केलं. अशाप्रकारे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरताचा संघ 15.5 षटकांत अवघ्या 100 धावांवर ऑलआऊट झाला आणि मुंबईलने 99 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cheese Analogue: हॉटेलमध्ये खाताय ते ‘पनीर’च आहे का? रेस्टॉरंट, हॉटेल चालकांकडून आरोग्याशी खेळ, अन्न व औषध प्रशासनाचा मोठा दणका
  • जगाचा विनाश करणारा डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश, थेट हाहाकार, काही क्षणात लष्करप्रमुखांना..
  • Raja Shivaji: फक्त अभिमान नाही, डोळ्यांत पाणी, अंगावर काटा..; रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरवर प्रतिक्रियांचा वर्षाव
  • Rapido Harrasment : ‘ तू क्युट दिसतेस, एकटी राहतेस का..?’ रॅपिडो ड्रायव्हरचा तरूणीला आक्षेपार्ह मेसेज ! पुढे जे घडलं..
  • नैसर्गिकरित्या चमकदार व तरूण तेजस्वी त्वचेसाठी आहारात ‘या’ व्हिटॅमिन सी युक्त उन्हाळी फळांचा करा समावेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in