
कडक उन्हाळ्यात अनेकांची त्वचा कोरडी आणि निस्तेज पडू लागते. त्यामुळे या ऋतूत अनेकजण त्वचेची काळजी घेताना बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रोडक्टचा वापर करतात. मात्र काळांतराने त्वचेच्या समस्या पुन्हा निर्माण होतात. अशातच तुम्ही जर नैसर्गिकरित्या चमकदार, तरूण आणि तेजस्वी त्वचा मिळवण्यासाठी आवश्यक पोषक तत्व असलेल्या पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी हे तुमच्या त्वचेसाठी सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे. कारण व्हिटॅमिन सी कोलेजन उत्पादनाला चालना देऊन त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते. यामुळे तुमची त्वचा केवळ तेजस्वीच राहत नाही तर तिचा घट्टपणाही टिकून राहतो ज्यामुळे त्वचा तरुण दिसते. तर काही उन्हाळी फळे व्हिटॅमिन सीचे उत्कृष्ट स्रोत आहेत. म्हणून तुमच्या उन्हाळ्यातील आहारात त्यांचा नक्की समावेश करा. चला तर मग आजच्या लेखात आपण उन्हाळ्यात कोणत्या हंगामी फळांचा सेवन तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल ते जाणून घेऊयात.
उन्हाळ्यातील फळांबद्दल बोलायचे झाल्यास लिची अनेकांचे आवडते फळ आहे. लिची मध्ये असलेला रसरशीत पोत आणि गोड-आंबट चव अप्रतिम असते. व्हिटॅमिन सी साठी हे सर्वोत्तम उन्हाळी फळांपैकी एक आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, 100 ग्रॅम लिचीमध्ये 71.5 मिग्रॅ व्हिटॅमिन सी असते, जे संत्र्यापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.
पपई देखील त्वचेसाठी फायदेशीर
पपई हे एक फळ आहे जे तुम्हाला प्रत्येक हंगामात बाजारात मिळेल. खरं तर या फळाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. काही झाडांना अवघ्या 8 ते 10 महिन्यांतच फळे येऊ लागतात. सध्या त्याचा वाढीचा हंगाम उष्ण आणि दमट असतो. या हंगामात काढलेली पपई सर्वोत्तम दर्जाची मानली जाते. हे फळ पचनासाठी उत्कृष्ट मानले जाते आणि त्यातील व्हिटॅमिन सीमुळे त्वचेसाठीही फायदेशीर आहे. 100 ग्रॅम पपईमध्ये 60.9 मिग्रॅ व्हिटॅमिन सी असते.
अननस
अननस मार्च ते जुलै दरम्यान बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. या महिन्यांमध्ये अननस सर्वात रसरशीत आणि गोड असते. उष्णकटिबंधीय फळ असल्याने ते उन्हाळ्यात खाणे आरोग्यासाठी व त्वचेसाठी उत्तम ठरते. एप्रिल ते मे आणि जून ते जुलै या काळात अननसाचा ऐन हंगाम असतो. या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या आहारात त्यांचा नक्कीच समावेश केला पाहिजे. 100 ग्रॅम अननसामध्ये 47.8 मिग्रॅ व्हिटॅमिन सी असते.
आंबा
उन्हाळ्यातील हंगामी फळ असलेल्या आंब्याला फळांचा राजा असे उगाच म्हटले जात नाही. जगभरातील लोकांना त्याची चव आवडते आणि तो पोषक तत्वांनीही परिपूर्ण आहे. कच्च्या आणि पिकलेल्या दोन्ही आंब्यांमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. USDA च्या आकडेवारीनुसार, 100 ग्रॅम कच्च्या आंब्यामध्ये 36.4 मिग्रॅ व्हिटॅमिन सी असते, जे एक चांगले प्रमाण आहे.
जर्दाळू
जर्दाळू हे उन्हाळ्यातील फळ आहे. जर्दाळू हे मे ते जुलै आणि ऑगस्टपर्यंत पीक येत असते. तुम्ही इतर दिवस जरी सुकवलेले जर्दाळू सेवन करत असले तरी या हंगामी फळाचा आपल्या आहारात ताज्या फळाच्या स्वरूपात नक्कीच समावेश केला पाहिजे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते, 100 ग्रॅम जर्दाळूमध्ये 10 मिग्रॅ व्हिटॅमिन सी असते. ते व्हिटॅमिन ए चा देखील एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे ते डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ई देखील अल्प प्रमाणात असते. ज्यामुळे ते त्वचेसाठी आणखी फायदेशीर ठरते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Leave a Reply