• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंच्या FDA ची मुंबई मोठी Action, मॅकडोनाल्डसह 13 प्रसिद्ध रेस्टॉरंट्ना दिला दणका

August 21, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने ( FDA )  मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने कुलाबा येथील मॅकडोनल्ड्स कियोस्कची तपासणी केली. या कियोस्कमध्ये अनेक त्रुटी आढळल्यानंतर एफडीएने मॅकडोनाल्डचा परवाना रद्द केला आहे. याशिवाय कुलाबामध्ये एफडीएने रेडिओ क्लब, स्टेटस रेस्टॉरंट सह १३ फूड आस्थापनांचे लायसन्स रद्द केले आहे.

रेडियो क्लबमध्ये कॉक्रोच, माशा आणि अस्वच्छता

महाराष्ट्र महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (FDA)ने सुरक्षा आणि स्वच्छतेचे नियमांचे उल्लंघन केल्याने मुंबईतील कुलाबा येथील बॉम्बे प्रेसिडन्सी रेडिओ क्लब लिमिटेडचे लायसन्स रद्द केले आहे. १९ ऑगस्ट रोजी अचानक पडलेल्या धाडीत ४७ टक्के नियमांचे उल्लंघन न केल्याचे आढळले. यावेळी केलेल्या तपासणीत माशांचा मोठा वावर येथे आढळला. एक मेलेले झुरळ आणि भांडी धुण्याच्या जागी आजूबाजूला कॉक्रोच ट्रॅप आढळले.

काय होती त्रुटी

अधिकाऱ्यांना आढळले की जेवण तयार करण्याच्या जागी छताचे प्लास्टर उखडलेले होते. ज्यामुळे जेवणात हे प्लास्टर पडण्याचा धोका होता. तसेच खाण्याच्या पिण्याच्या वस्तूंच्या बाजूलाच थेट वॉशिंग पावडर आणि केमिकल ठेवण्यात आले होते. भांडी आणि खाण्या-पिण्याच्या वस्तू थेट जमीनीवर ठेवलेल्या आढळल्या. नॉन-व्हेज ठेवण्यात येणारा फ्रिज स्वच्छ नव्हता आणि फ्रोजन आहाराच्या वस्तूंना नीट नॉर्मल केलेले नव्हते.

स्फाटच्या घामाने भिजलेलेल हेल्मेट आणि कपड खाण्याच्या वस्तूंच्या जागी ठेवलेले आढळले. स्वयंपाकाचा दरवाजा नीट बंद केलेला नव्हता. जेवण बनवणाऱ्या स्टोव्हच्या जवळच कचऱ्याचा डबा ठेवलेला आढळला. आणि परिसरात थुंकल्याचे डाग देखील आढळले.

या झाडाझडीत संस्थेने नियमांचे पालन न करण्याचा दर ४७ टक्के होता. आरोग्य आणि सुरक्षेचा हवाला देत एफडीएने FSS एक्ट 2006 च्या कलम 32(3) अंतर्गत लायसन्स सस्पेंड केले आहे. क्लबला सस्पेंशन दरम्यानच्या काळात अन्नपदार्थांची खरेदी, विक्री आणि वितरणावर तातडीने बंदी घातल्याचा आदेश दिला आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे.

हात न धुता अन्नपदार्थांना स्पर्श करणे, कॅलिब्रेट न केलेला रिफ्रीजरेशन युनिटचा वापर, आणि तापमान मोजण्याचे कोणताही रेकॉर्ड नसणे, आदी मुलभूत सुविधा देखील पाळल्या जात नसल्याचे या धाडीत आढळले.

मॅकडोनाल्ड्सला दंड

कुलाबा येथील मॅकडोनाल्ड्सच्या एका किऑस्कने २० पैकी १८ सुरक्षा मानकांची पूर्तता न केली नसल्याचे आढळले. तसेच १४८ पानांचा खोटा शिस्तपालन अहवाल सादर केल्याबद्दल आणि मेन्यूमध्ये उल्लेख न करता फसवणुकीने चीज अॅनालॉग वापरल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.

सर्व कायदेशीर बंधनकारक नियमांचे पालन सुनिश्चित होईपर्यंत, अन्न आणि पेयांचे उत्पादन, विक्री आणि वितरण यावर बंदी घालीत, FSS कायदा २००६ अंतर्गत असलेले परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in