• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe: लोक मला अहंकारी समजतात, पण… त्या आरोपांवर तुकाराम मुंढे यांचे टीकाकारांना थेट उत्तर, अनेकांची बोलती बंद

August 16, 2026 by admin Leave a Comment


राज्यात अनेक सनदी अधिकारी गाजले. त्यांच्या प्रामाणिक आणि सडेतोड भूमिकेचे जनतेने कौतुक केले आहे. असे बोटावर मोजणारे अधिकारी उरलेत असा लोकांचा पक्का समज आहे. त्यात खरेपणा सुद्धा आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचा बेबाकीपणा, त्यांची धडाकेबाज कारवाई सध्या राज्याच्या सर्वच वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अन्न आणि औषध प्रशासन खात्याचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळखोरांची झोप उडाली आहे. अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांमुळे राज्यातील अनेक महत्त्वाचे विषय सुद्धा जणू झोकळले गेले आहेत. राजकीय, बुवाबाजी आणि फसवणुकीची प्रकरणे हेडिलाईनमधून गायब झाल्याची ओरड होत आहे. त्याचवेळी तुकाराम मुंडे यांची एक व्यथाही समोर आली आहे. त्यांच्या स्वभावावर बोट ठेवणाऱ्यांना त्यांनी सणसणीत टोला दिला आहे.

ते मला अहंकारी समजतात, पण…

काही लोक मला अहंकारी समजतात. पण मी अहंकारी नव्हे अशा वेदना सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी मांडली. एखादा अधिकारी सक्षम भूमिका घेत असेल. प्रस्थापितांना जुमानत नसेल तर सहाजिकच त्याच्यावर बालंट आणण्याचा प्रयत्न होतोच. त्याला अनुलेखनाने मारणे अथवा त्याच्याविषयी चुकीचा संदेश देणे, त्याची बदनामी करणे असे प्रयत्न केल्याच जातात. त्यात नवल नाही. धडाकेबाज मुंढे यांच्याबाबतीत असेच घडले.

या आरोपांनी मुंढे व्यथित झाले. पण त्याचवेळीत त्यांनी टीकाकारांना सुनावले. आपण अहंकारी नाही, तर स्पष्टवक्ता आहे असे त्यांनी सांगितले. स्पष्टवक्तेपणा आणि अहंकार यांच्यात खूपच बारीक रेषा आहे. आपल्या भूमिकेबाबात प्रामाणिक आणि पारदर्शक राहणे, हीच आपली कार्यपद्धती आहे, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली. त्यांनी आपली भूमिका विषद करताना अत्यंत सुक्ष्म अर्थ टीकाकारांना सांगितला. एखाद्याच्या देहबोलीवरून अथवा हवाभावावरून कोणीची चुकीचा अर्थ काढणे इष्ट नाही हेच मुंढे यांनी स्पष्ट केले. त्यांनी अशा उपटसुंभांची या उत्तराने बोलती बंद केली.

कर्तव्य दक्ष आणि कडक शिस्तीचे अधिकारी

तुकाराम मुंढे हे संपूर्ण महाराष्ट्राला अगोदरपासूनच परिचित आहेत. त्यांच्या सातत्याने होणाऱ्या बदल्यांनी ते कडक शिस्तीचे भोकते असल्याचे समोर आले होते. ते एक अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने त्यांच्या पायाला भिंगरीच होती. प्रशासकीय सेवेत वक्तशीरपणा, झोकून देऊन काम करणे आणि भ्रष्टाचारी, भेसळखोरांविरोधातील त्यांच्या भूमिकेने ते राज्यालाच नाही तर देशाला परिचित झाले आहेत. त्यांची जनमानसातील लोकप्रियता आता शिखरावर आहे.

बीड जिल्ह्यातील ताडसोना या गावातून त्यांचा प्रवास सुरू झाला. एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाची त्यांच्यावर छाप आहे. गावातील संस्कृतीशी त्यांची जोडलेली आहे. जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 2005 मध्ये ते सनदी अधिकारी झाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in