• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या FDAचा ‘हॉटेल चुल मटण’ला मोठा दणका, थेट परवाना निलंबित, काय घडलं?

August 19, 2026 by admin Leave a Comment


Tukaram Mundhe FDA: सध्या सगळीकडे तुकाराम मुंढे यांची चर्चा सुरु आहे. अन्न भेसळ करणाऱ्यांच्या मुसक्या ते आवळत आहेत. अन्न भेसळ करणाऱ्या लोकांवर धाडधाड कारवाई करत त्यांचे थेट परवाने निलंबित केले जात आहे. आता पुन्हा एकदा FDA ने एका हॉटेलवर एक कारावाई केली आहे. अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोहेगाव येथील ‘हॉटेल चुल मटण’चा अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. सुधारणा होईपर्यंत संबंधित हॉटेलने अन्न व्यवसाय करू नये, असे निर्देश एफडीएने दिले आहेत.

अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या सुनिश्चितेसाठी राज्यात तपासणी मोहिम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत नगर रोड परिसरातील जुना खराडी जकात नाका, खांदवे नगर, लोहेगाव येथील हॉटेल चुल मटणची तपासणी करण्यात आली. यावेळी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या अनुसूचीत नमूद केलेल्या स्वच्छता व आरोग्यविषयक निकषांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आले. अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता केलेली आढळली नाही यामुळे आता कारवाई करण्यात आली.

पुणे विभागात 14 ते 17 ऑगस्टदरम्यान तीन आस्थापनांची तपासणी करण्यात आली होती. या तपासण्यां दरम्यान प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आल्याने आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई कारवाई केली गेली. या कारवाईतून लाखोंचा माल जप्त करण्यात आला. तब्बल 10 लाख 7 हजार 460 रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा एका झटक्यात जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणांत तीन अस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तर सात जणांना अटकही करण्यात आली. तसेच दोन आस्थापना सील करण्यात आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या वाहतुकीसाठी जे वाहन वापरण्यात आले तेही जप्त करण्यात आले.

मुंबईतील सहा हॉटेलवरही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील अन्न सुरक्षा विभागाने (FDA) तपासणीदरम्यान स्वच्छता, साठवणूक, तापमान नियंत्रण आणि देखभालीमध्ये त्रुटी आढळल्याने मुंबईतील आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. यात एक नाही तर सहा मोठ्या हॉटेलचा समावेश आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in