• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची थेट राजस्थानात बदली? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ; नेमकं सत्य काय?

August 20, 2026 by admin Leave a Comment


अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात सुरू केलेल्या धाडसत्रामुळे भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. पनीर, आईस्क्रीमसह विविध खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरही कारवाई करण्यात आल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवायांमुळे FDA आयुक्त आणि IAS अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांच्या 26व्या बदलीबाबत एक दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंढे यांची महाराष्ट्रातून राजस्थानमधील सीकर येथे बदली झाल्याचा दावा या पोस्टमधून करण्यात आला आहे. या चर्चेमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातही अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले. मात्र, तुकाराम मुंढे यांनी स्वतः या वृत्ताचे खंडन करत हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे.

21 वर्षांत 25 बदल्या

तुकाराम मुंढे हे त्यांच्या शिस्तप्रिय आणि कठोर प्रशासकीय कार्यशैलीसाठी ओळखले जातात. 21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांच्या तब्बल 25 वेळा बदल्या झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या संभाव्य 26व्या बदलीची चर्चा सुरू होताच या दाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि विविध मेसेजिंग ग्रुपवर मुंढे यांची राजस्थानमध्ये बदली झाल्याच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात होत्या. मात्र, या दाव्याबाबत तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजस्थानमध्ये बदली झाल्याचे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले.

राजस्थानला बदली झाल्याचा दावा चुकीचा

तुकाराम मुंढे यांची राजस्थानला बदली झाल्याचा दावा करणारी हिंदी भाषेतील पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांची 26वी बदली राजस्थानमध्ये झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर अनेकांनी ही पोस्ट शेअर करत राज्य सरकारवरही टीका केली.

मात्र, उपलब्ध माहितीनुसार हा दावा दिशाभूल करणारा आहे. तुकाराम मुंढे यांची राजस्थानमध्ये कोणतीही बदली झालेली नाही. ते महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असून सध्या महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

मुंढे म्हणाले, “माझा राजस्थानशी काय संबंध?”

गेल्या दोन दिवसांपासून राजस्थान सरकार किंवा राजस्थान कॅडरमध्ये तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्याचे संदेश सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहेत. राज्यात FDAकडून भेसळखोर आणि अस्वच्छ खाद्य आस्थापनांविरोधात सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट व्हायरल झाल्याने चर्चेला अधिक उधाण आले.

मात्र, या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. राजस्थानला बदली झाल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “राजस्थानला बदली? माझा राजस्थानशी काय संबंध? मी अशी काही पोस्ट पाहिली नाही आणि राजस्थानला माझी बदली होण्याचे काही कारणही नाही. मी महाराष्ट्र कॅडरचा आहे, माझी महाराष्ट्रातच बदली होऊ शकते,” असे स्पष्ट केले.

त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या राजस्थान बदलीची सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही व्हायरल पोस्टवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत सरकारी आदेश किंवा विश्वसनीय स्रोतांकडून माहितीची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in